जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात येते. या निमित्ताने राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. रयतेच्या राजाची जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. १९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. गावातील गल्लीपासून ते शिवनेरी किल्ला ते अमेरिकेतल्या न्यूयॉर्क पर्यंत शिवजयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपडा शहरात मराठा प्रीमियर लिंग व श्रीमती विमलबाई सोनवणे फाउंडेशन च्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचा प्रांगणात शिवकालीन वस्तू व शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन बाल शिवाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात वापरण्यात आलेले शस्त्र व वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. ह्या वस्तू व शस्त्रे पाहण्यासाठी चोपडा शहर व तालुक्यातील शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी येत आहेत.
प्रत्यक्ष वस्तू व शस्त्र पाहताना आपण पुस्तकात पाहिलेले शस्त्र व वस्तु व शिकलेलो ऐकलेले गोष्टी या प्रदर्शनामध्ये पहावयास मिळत असल्याने विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत आहे.