येवला शहरात मकर संक्रांतीला पतंग उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षाची परंपरा असून तीन दिवसीय पतंग उत्सवाला येवल्यातील पतंगप्रेमी पतंग उडवतात. हेच पतंग बनवण्याकरता सध्या कारागीर व्यस्त असल्याचे चित्र सध्या दिसत असून विविध आकाराचे विविध प्रकारचे पतंग येवला शहरात बनवण्यात येतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येवला शहरात पतंग खरेदी करता येत असतात.
देशभरात सुरत पाठोपाठ महाराष्ट्रातील नाशिकच्या येवल्याचा संक्रांत उत्सव हा जगभरात प्रसिद्ध आहे. येवला तालुक्यात तीन दिवसीय संक्रांत उत्सव साजरा केला जातो. या तीन दिवसांमध्ये पतंग आणि मांजा एकत्र करण्यासाठी आसरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. येवल्यातील बुरुड समाज हा आसरी बनवण्याचा व्यवसाय करत असतो. गणेश उत्सवाच्या समाप्तीनंतरच आसारी बनवण्याची लगबग सुरू केली जाते. बांबूपासून आसरी तयार केली जात असून आसरी बनवण्यामुळे बुरुड समाजाला हाताला रोजगार मिळत असून लाखोंची उलाढाल यातून होत असते. बांबूची ही आसरी गुजरात राज्यातील सुरत, संभाजीनगर, अहिल्यानगर, धुळे, नाशिक विक्रीसाठी पाठवली जाते.
आसरी सोबत संक्रांत उत्सवाचा प्रमुख घटक असलेला पतंग हा देखील येवल्यात घरोघरी बनवला जातो येवल्यातील भावसार कुटुंबीय तीन पिढ्यांपासून पतंग बनवण्याचा व्यवसाय करतात. वर्षभर पतंग बनवण्याची लगबग येवल्यात सुरू असते. विविध रंगाचे विविध आकाराचे पतंग येवल्यात बनवले जातात. तसेच ऑर्डरप्रमाणे देखील पतंग बनवले जातात. या पतंग व्यवसायातून कुटुंबाला रोजगार मिळत असून लाखोंची उलाढाल पतंग व्यवसायात होत असते.
हे ही वाचा:
अश्विननंतर ‘या’ भारतीय खेळाडूने घेतली निवृत्ती, सामन्यानंतर अचानक तडकाफडकी राजीनामा
सुरेश धस जे आरोप करतात त्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त झालं पाहिजे – Laxman Hake