खेड्यातील ज्या मुलांना चौथीनंतर शाळा शिक्षण म्हणजे संकट वाटायचं, दहा दहा किलोमीटरची पायपीठ करावी लागायची. सातवीपर्यंत शाळा शिकून नंतर कुठेतरी नोकरी करायची याच महाराष्ट्रातील खेड्यात राहणाऱ्या मुलांच्या कथा. महाराषट्रातील गावागावात पुणे मुंबईसारख्या ठिकाणी कॉलेज उभे झाले आणि शाळेला न जाणारी पिढी मग अभियांत्रिकी करुन देशापरदेशात जाऊ लागली, ही सगळी देण आहे ती म्हणजे वसंतदादा पाटील यांची. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील. वसंतदादा पाटील हे सांगली जिल्ह्यातील (Sangli District) पद्माळे या लहानशा खेड्यात 13 नोव्हेंबर 1917 रोजी दादांचा-वसंत बंडूजी पाटील यांचा जन्म झाला, आणि 1 मार्च 1989 रोजी वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. महाराष्ट्राचे सलग चार वेळा मुख्यमंत्री पद भूषवलेल्या वसंतदादा पाटील यांचा आज स्मृतिदिन त्यानिमित्त…
वसंतदादा पाटील यांचे राजकीय कारकीर्द
१९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर वसंतदादा पाटील यांनी १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. वसंत पाटलांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही.
महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व (पर्यायाने) औद्योगिक विकासालाही चालना मिळाली.
वसंतदादा पाटील यांच्या संस्था :
- वसंतदादा पाटील साखर कारखाना
- वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट (आधीचे नाव डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट), वाकडेवाडी (पुणे)
- डॉ. वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यानिकेतन, शुक्रवार पेठ (पुणे)
- पद्मभूषण डॉ वसंतदादा पाटील कॉलेज ऒफ आर्किटेक्चर, पिरंगूट (पुणे)
- वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, सायन (मुंबई)
- वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, बुधगाव (सांगली)
- वसंत दादा पाटील विद्यालय व जुनियर कॉलेज, रहिमतपूर
- पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऒफ टेक्नोलोजी बुधगाव (सांगली)
आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास कार्यामुळे महाराष्ट्र आज सकारात्मता पद्धतीने घडत आहे. म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.
हे ही वाचा:
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन
Follow Us