आज ८ मार्च महिला दिवस आज कोणत्याही क्षेत्रामध्ये महिला या पुरुषांपेक्षा मागे नाहीत हे आपण पहिला आहे. देशाच्या पुरूष प्रधान संस्कृतीला फाटा देत मागील काही वर्षात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा पुढाकार वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के अधिकार मिळाले आहे. त्यातच शासनाच्या विविध उपक्रमांसह नोकरी मध्येही महिलांना संधी मिळत असून महिला सक्षम होत असल्याचे अनेक उदाहरण बघावयास मिळतात. गोंदिया एस.टी. आगारात ४० महिला काम करीत असून त्या पैकी ११ महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून यांत्रिकरणाचे कामे करतात.
गोंदिया जिल्ह्यात नागरिकांना तसेच शालेय विद्यार्थिनींना वाहतूक सुविधा देणारी शहरी भागात सोबतच ग्रामीण भागात जी लाडकी लालपरी म्हणजे एस टी बस. जिल्ह्यात या बसेसची देखभाल दुरुस्थितीची जवाबदारी गोंदिया आगारातील ११ महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. यात एस.टी. बसचा पंचर बनविण्यापासून ते इंजिन रिपेरिंग ते इलेक्ट्रिकल वायरिंग ते वाशिंग ते किलिंग ही सर्व कामे महिला करतात. तर देखभालच दुरुस्तीच नाही तर गाडी दुरुस्त झाल्यावर व्यवस्थित चालते की नाही याची चाचणी देखील स्वतः महिला करतात त्यामुळे आज महिला दिनाचे औचित्य साधून भंडारा गोंदिया विभागीय आगार नियंत्रक तनुजा अहिरकर यांनी गोंदिया आगारात येत महिलांना महिलांच्या दिनाच्या शुभेक्षा देत पुष्प देऊन स्वागत केले आहे.
तर आजच्या युगात महिलांनी देखील सर्वच क्षेत्रात कामे कार्याला सुरुवात केली असून स्वतः आत्मनिर्भर होण्याचा काम महिला करीत आहेत. त्यामुळे पुरुषांप्रमाणे महिला देखील आत्मनिर्भर झाल्या असून सरकार देखील महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आणि लाडक्या बहिणी सारख्या योजना ह्या महिलांच्या विकासासाठी फार महत्त्वाच्या ठरत आहेत.
हे ही वाचा:
अनिल परब यांनी केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल त्यांनी सभागृहाची जाहीर माफी मागावी – Pravin Darekar
….म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत! – CM Devendra Fadnavis