श्रावणातील (Shravana) प्रत्येक सोमवारी सर्वच मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. अशीच गर्दी आज नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात पाहायला मिळत आहे. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. यावेळी भाविकांनी ब्रम्हगिरी फेरीचा आनंदही घेतला आहे. या सोमवारी एक लाखाहून अधिक भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. यावेळी त्र्यंबकनगरी फुलून गेल्याचे पाहायला मिळाले. ब्रम्हगिरी फेरी मार्गावर बम बम भोलेच्या नामात रंगून गेले आहेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwar Jotirlinga) मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर होत असते. तर श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणार गर्दी होत असते. यावेळी श्रावणातल्या पहिल्या सोमवारी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे. श्रावणातल्या सोमवारानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये जवळपास लाख ते दीड लाख भाविकांची गर्दी केली आहे. देशभरातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. आजच्या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबक नगरी भाविकांनी फुलून गेली.
श्रावण महिन्यात मोठ्या प्रमणावर भाविक देवदर्शनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे श्रावण महिन्यात विशेष महत्व असते. यादिवशी ब्रम्हगिरीची (Brahmagiri) प्रदक्षिणाही केली जाते. श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. ब्रम्हगिरीची प्रदक्षिणासाठी रविवार सायंकाळपासून ते सोमवारी दुपारपर्यंत भाविक गर्दी करून असतात. एक लाखापेक्षा जास्त भाविकांनी ही प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. भाविकांची गर्दी पाहता इथे एक मानवी साखळी तयार झाली आहे. प्रदक्षिणा मार्गावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने फराळाचे पदार्थ, केळी, चहाचे वाटप करण्यात येते. तिर्थराज कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दुपारी 3 वाजता पारंपारीक पद्धतीने भगवान त्र्यंबक राजाचा पालखी सोहळा संपन्न झाला .
तिसऱ्या श्रावणी सोमवारी गर्दी लक्षात घेत त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर पोलीस, नाशिक जिल्हा प्रशासन, एसटी महामंडळ, त्र्यंबकेश्वर स्थानिक प्रशासन यांच्याकडून नियोजन करण्यात आले आहे. नाशिकला जाण्यासाठी २५० बसेस सोडण्यात आल्या आहेत. यावेळी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांकडून देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये चार डीवायएसपी, १७ पोलीस अधिकारी, २८ एपीआय, पीएसआय, ४५० पोलीस कर्मचारी, ३० ट्राफिक कर्मचारी, ५०० होमगार्डचा ताफा त्र्यंबकेश्वरसह ब्रम्हगिरी फेरी मार्ग, पार्किंगची ठिकाणे आदी ठिकाणी तैनात करण्यात आला होता.
हे ही वाचा:
चॅटजीपीटीद्वारे लसीकरणाला चलाना मिळणार
चांद्रयान ३चे विक्रम लँडर २२ सप्टेंबरपासून अॅक्टिव्ह होण्याची शक्यता
Exclusive, CP Vivek Phansalkar: प्रत्येक क्षणाला सुरु असते मुंबई पोलिसांची कसोटी