बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांच्या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
उद्या या मागण्यासाठी सांगलीत आक्रोश मोर्चा रद्द काढण्यात येणार होता मात्र आक्रोश मोर्चा रद्द करून त्याऐवजी आज सांगलीत एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. मस्साजोग तालुका केज बीड जिल्हा येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर व निघृण हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांची झालेली हत्या या दोन्ही घटनेचा निषेध करण्यात आला.
सदरचा खटला हा फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा. तसेच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये सर्वच महत्त्वाच्या शासकीय पदावर एकाच वंजारी जातीचे अधिकारी कसे आले याची चौकशी व्हावी. संतोष देशमुख यांची कन्या वैष्णवीस शासकीय नोकरीमध्ये सामावून घ्यावे, तसेच देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबीयांना शासनाकडून भरघोस आर्थिक मदत देण्यात यावी. वाल्मीक कराडच्या देशातील, परदेशातील संपूर्ण संपत्तीची इन्कम टॅक्स व ईडीकडून चौकशी करण्यात यावी व या मध्ये जे कोण सूत्रधार असतील त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई व्हावी. या गुन्ह्यामधील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करावी पण नार्को टेस्टमध्ये ज्या ज्या संबंधितांची नावे निष्पन्न होतील त्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी.
हे ही वाचा :
Davos Investment : Tata Group करणार ३०,००० कोटी गुंतवणूक- CM Devendra Fadnavis
Davos मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट, पहिला करार राज्यातील Gadchiroli साठी