spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

कांद्याला दराची ‘झळाळी’, शेतकरी दु:खी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे सध्या विक्रीसाठी कांदा आहे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे सध्या विक्रीसाठी कांदा आहे, त्यांना फायदा होत आहे. दरम्यान, सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदाच शिल्लक नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा होता, त्यावेळी त्याला दर नव्हता. आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याच्या दराला झळाळी आली आहे.

दर आहे पण कांदा नाही
कांद्याच्या दराच्या बाबतीत सध्या शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. कांद्याला भाव वाढले पण कांदा शिल्लक नसल्याचे दुःख शेतकऱ्यांना आहे.

कांद्याला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांकडे मात्र, विक्रीसाठी कांदा शिल्लक नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे फारसा कांदा शिल्लक राहिलेला नसताना कांद्याचे भाव आता चांगलेच वधारु लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी ४ हजार ८०० रुपये तर जास्तीत जास्त ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागला आहे..

सध्या कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडे सध्या विक्रीसाठी कांदा आहे, त्यांना फायदा होत आहे. दरम्यान, सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदाच शिल्लक नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कारण ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा होता, त्यावेळी त्याला दर नव्हता. आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याच्या दराला झळाळी आली आहे

Latest Posts

Don't Miss