जगभरात युध्द, संघर्ष, अस्थितरता, तणाव व अराजकतेचा उन्माद माजला असताना प्रजासत्ताक भारताची वाटचाल अत्यंत दिमाखदारपणे करण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या संविधानाचा गौरव आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्याच्या हेतूने नांदेड नगरीत ३ व ४ मार्च संविधान अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याची जोरदार तयारी सुरू असून, दिग्गजांची उपस्थिति महोत्सवास लाभणार असल्याची माहिती महोत्सवाचे उद्घाटक खा. रविंद्र चव्हाण यांनी दिली.
बुध्दीस्ट रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने नांदेड येथील कुसूम सभागृहात संपन्न होणाऱ्या संविधान महोत्सवाचे उद्घाटन दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता खा. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी एकनाथ मोरे राहणार आहेत. ख्यातकिर्त विधिज्ञ माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचे प्रमुख व्याख्यान होणार असून, महोत्सवात गोरक्ष लोखंडे (पुणे), प्राचार्य डॉ. सुभाष गवई (अमरावती), डॉ. बबन जोगदंड (यशदा, पुणे) व प्रा.डॉ. कविता सोनकांबळे यांचे मार्गदर्शन होणार आहे. मंचावर आनंद चव्हाण (माजी महापौर), कामाजी पवार (मराठा सेवा संघ), दशरथराव लोहबंदे, बालाजी इवितदार (ओबीसी नेते), अॅड. एम.झेड. सिध्दीकी, इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, अशोक पेद्देवाड, शंकर शिंदे व बा.रा. वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे.
या महोत्सवाच्या औचित्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रेट डिव्होटी अवार्ड स्मृतिशेष दादासाहेब गायकवाड यांना जाहिर झाला असून, त्यांचे पुतणे प्रभाकर गायकवाड (नाशिक) हे हा पुरस्कार स्वीकारतील. संविधानाचा अविरत प्रचार व प्रसार करणारे ह.भ.प. गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापूरकर, डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे (परभणी), दीपक कदम (प्रमुख आंबेडकरवादी मिशन), डॉ. गंगाधर सोनकांबळे (संविधान अकॅडमी), प्रा. डॉ. अनंत राऊत, दत्ता तुमवाड, कामगार नेते गणेश शिंगे व सामाजिक कार्यकर्ते सुरेश हाटकर या मान्यवरांना संविधान भुषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच संविधान अमृत चषक राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या विजेत्यांचे पारितोषिक वितरणही होणार आहे. दुसऱ्या दिवशी ४ मार्च रोजी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात ख्यातनाम आंबेडकरी गायिका कडुबाई खरात यांच्या गीतगायना कार्यक्रम होणार असून, डॉ. विजय कदम (मुंबई), इंदिरा अस्वार (बार्टी, पुणे), निशांत धापसे (सिनेदिग्दर्शक. मुंबई), दशरत पाटील (संचालक, आय. आय.बी.), इंजि. संघरत्न सोनसळे, विलास सिंदगीकर (लातूर), प्रशांत वंजारे (अरणी), डॉ. करूणा जमदाडे व डॉ. आशालता गुट्टे यांची उपस्थिती राहणार आहे.
गणेशोत्सवासाठी POP आणि उंच मूर्तींना बंदी; मुंबई महानगरपालिकाकडून परिपत्रक जारी
Follow Us