Saturday, April 20, 2024

Latest Posts

खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुलींपैकी ७ मुलींना वाचवण्यात यश २ मुली मृत्यू

कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी ९ मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने २ मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या या सगळ्या मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून पुण्यातील गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला आल्या होत्या.

कलमाडी फार्म हाऊसजवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी ९ मुली पोहण्यासाठी उतरल्या होत्या मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने २ मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या या सगळ्या मुली बुलढाणा जिल्ह्यातील असून पुण्यातील गोरे खुर्द गावात त्यांच्या नातेवाईकाकडे बारशाचा कार्यक्रमाला आल्या होत्या. या दोघींच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खडकवासला धरणाच्या गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आले आहे. हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. तर गावकऱ्यांच्या प्रसंगावधानाने नऊ पैकी सात मुलींना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले तर दुर्दैवाने अंदाजे सोळा ते सतरा वयाच्य दोन मुलींचा शोध लागला नाही. स्थानिक पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम व पोलीस हवालदार दिनेश कोळेकर यांच्या कडून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी असणाऱ्या काही गावकऱ्यांकडून प्राथमिक माहिती समोर आली आहे. जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांना कळताच क्षणाचाही विलंब न करता गावकऱ्यांनी पाण्यात उडी मारून त्या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या मुलींना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील दोन मुलींचा मृत्यू झाला आहे.मृत पावलेल्या मुलींपैकी खुशी संजय खुर्दे १४ वर्ष आणि शीतल भगवान टिटोरे १५ वर्ष अशी नावे असून या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे.मुलींचा शोध घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून थोड्याच वेळात जवान पोहोचतील अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांनी दिली आहे.

खडकवासला आणि पानशेत धरण परिसरात आतापर्यंत अनेक घटना घडल्या आहे. सुरक्षेसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक उत्साही तरुणांचा जीव जात आहे. कोणतीही अनुचित घटना घडली तर धरणाचं अंतर शहरापासून दूर असल्यामुळे पोहचायला परिणामी उशीर होतो. त्यामुळे अनेक घटनांमध्ये मृत्यू झाले आहेत, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. पर्यटकांनीही सावधगिरी बाळगली पाहिजे आणि खोल पाण्यात उतरु नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. येत्या काळात अशा घटना घडू नयेत यासाठी आता अधिकाऱ्यांनी पावले उचलणे आणि सुविधा उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे. प्रत्येक पर्यटकाला कोणतीही चिंता न करता निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे.

हे ही वाचा : 

एकनाथ शिंदे घेणार वाहनचालकांसाठी मोठा निर्णय

अहमदनगरच्या शेवगावमध्ये दोन गटांत राडा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Latest Posts

Don't Miss