महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीला सुरु होणार असून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीला सुरु होणार आहे. तर दहावी बारावी परीक्षेचे निकाल १५ मे पर्यंत लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर आता दहावी बारावीच्या हॉलतिकिटात मोठे बदल केल्याचं समोर आले आहे. या हॉलतिकिटवर जातीचा उल्लेख करण्यात आला आहे.
दहावी बारावीच्या हॉलतिकिटवर जातीचा उल्लेख केल्याने पालकांनाही धक्का बसला आहे. कास्ट कॅटेगरी असा वेगळा रकाना हॉलतिकिटवर कशासाठी असा प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून हॉल तिकिटावर महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले आहे. तर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या जातीची नोंद का झाली आहे हे पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी हॉलतिकिटवर जात प्रवर्गाच्या रकाना असल्याचा बोर्डाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
शरद गोसावी यांनी यावेळी म्हटले की, शाळेत विद्यार्थ्यांची कोणती जात नोंदवण्यात आली याची माहिती पालकांनाही व्हावी म्हणून दहावी आणि बारावीच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख केला आहे. यंदापासून यासाठी कास्ट कॅटेगरीचा रकाना हॉलतिकिटवर असणार आहे. शालेय शिक्षण घेतल्यांनंतर विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी गेला की बदल करता येत नाहीत. त्यामुळे चुकीची नोंद झाली असल्यास पालकांना योग्य ती कागदपत्रे सादर करून शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक कार्यालयातून दुरुस्ती करता येईल.
हे ही वाचा :
“पक्षाने अपमानित केल्याची त्यांची…”Praful Patel यांचे भुजबळांविषयीचे वक्तव्य