अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांच्या भेटीबाबत छगन भुजवळ यांनी मौन सोडत थेट उत्तर दिले आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कोणत्याही प्रकारची भेट झाली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस नेते प्रफुल पटेल व ओबीसी नेते छगन भुजवळ पक्षात नाराज असल्याचे म्हटले जात आहे. जागावाटपात त्यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी उघडपणे दाखवली आहे. त्यांच्या या नाराजीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. दरम्यान पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची भेट झाली का विचारलं असता उद्ग्विन्न होऊन मला याबाबाबत काहीच बोलायचे नाही, आता माझ्या सर्व भावना आता मेल्या आहेत.
यावर दोन दिवसांपूर्वी नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे म्हणाले की, छगन भुजवळ यांचे खूप लाड झाले आहेत तरी ते नाराज का असतात ? त्यावर बोलताना भुजवळ म्हणाले की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक सदस्य आहे. शरद पवार साहेबांसोबत झेंडा, पक्षाचे नाव, घटना काय असावी हे माझ्यासमोर ठरले आहे. कोकाटे मात्र उपरे आहेत. पाच वर्षापूर्वी ते पक्षात नव्हते. पाच वर्षापूर्वी त्यांनी माणसे पाठवली. त्यांना यायचे आहे म्हणून, तेव्हा मी पवारांना विचारले, त्यावेळी ते नाही म्हणाले. त्यानंतर आम्ही पवारांना समजावले. तेव्हा त्यांनी सांगितले तुम्हाला काय करायचे ते करा. कोकाटे काल आलेले आहेत. त्यामुळे माझा पक्ष आणि मी काय करायचे ते पाहून घेऊ. कोकाटे यांना बोलण्याचा काही अधिकार नाही.
३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र एकाच मंचावर आले होते. शरद पवार यांनी त्या कार्यक्रमात एक कागदावर संदेश लिहिला. लिहून झाल्यावर तो कागद त्यांनी बाजूला ठेवला. त्यांच्या शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांनी हा कागद वाचला. त्यानंतर त्यांच्यात चर्चा झाली. मग दोन्ही नेते हसूही लागले होते. त्या चिठ्ठीत नेमके काय होते? याबद्दल खुलास करताना भुजवळ यांनी बोलताना मोजक्या शब्दात स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “त्यावर लिहिले होते ‘परदे मे रहने दो, पर्दा ना उठाओ’ (भुजबळ मनसोक्त हसले). मी सांगितले ना. उत्तर दिले ना आता”, अशी गुगली टाकत भुजबळ यांनी पत्रकारांची मजा घेतली.
हे ही वाचा:
Bhau Torsekar थेट म्हणाले, Nikhil Wagle यांनी शिवसेना संपावी म्हणून पत्रकारिता केली…
Matoshree, Sanjay Raut, Uddhav Thackeray, Bhau Torsekar की… नेमकं कोण झालं बदनाम?