मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलने प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत रेल्वेच्या तिन्ही हार्बर, वेस्टर्न आणि सेंट्रल मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे जर तुम्ही कुठे फिरण्याचा जायचं प्लॅन करत असाल, तर मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वतीने रविवारी २२ सप्टेंबर रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच यामुळे लोकलच्या वेळेवरही परिणाम होत आहे.
मुंबई उपनगरीय मध्य रेल्वे मार्गावर काल २१ डिसेंबर आणि आज २२ डिसेंबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कल्याण आणि कल्याण- कर्जत विभागावर गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे. यासाठी एक विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि कल्याण ते कर्जत विभागात चालवण्यात येणाऱ्या अप आणि डाउन मार्गावरील गाड्यांवर परिणाम होणार आहेत. त्यासोबतच अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज घराबाहेर पडल्यानंतर गैरसोय टाळायची असेल तर मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे दिलेल्या महिनीनुसार, आज २२ डिसेंबर आणि २३ डिसेंबर रोजी रविवारी आणि सोमवारी रात्री २ ते ५.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे, तसेच ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकानांवर दरम्यान तिसरा नवीन पत्रीपुल रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. डोंबिवली -कल्याण अप आणि डाउन धीमी लाईन (प्लॅटफॉर्मसह – क्रॉसओवर वगळता), डोंबिवली- कल्याण अप आणि डाउन जलद मार्गावर (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता), पाचव्या आणि सहाव्या मार्गावर (प्लॅटफॉर्म आणि क्रॉसओवर वगळता) हा ब्लॉक घेण्यात येईल.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन:
- ट्रेन क्र. १८०३० अप शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. १२८१० अप हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस अनुक्रमे टिटवाळा आणि खडवली स्थानकांवर १५ मिनिटांनी नियमित केली जातील. ट्रेन क्रमांक १२१३२ अप साईनगर शिर्डी – दादर एक्स्प्रेसही उशिराने धावणार आहे.
- गाडी क्रमांक ११०२० भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्स्प्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवली जाईल आणि पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबवली जाईल. गाडी क्रमांक ११०२० वगळता सर्व सहाव्या मार्गावरील मेल/एक्सप्रेस गाड्या कल्याण आणि दिवा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालतील.
उपनगरीय गाड्या शॉर्ट ओरीजनेट असतील
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- आसनगाव ही आसनगाव येथे ०८.०७ वाजता येणारी लोकल कल्याण येथून सुटेल. टिटवाळा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०५.४० वाजता येणारी लोकल ठाणे येथून सुटेल.
या गाड्या रद्द राहणार
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- अंबरनाथ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.०२, ०५.१६ आणि ०५.४० वाजता सुटणारी,
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कसारा लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०.०८ वाजता सुटते व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी तसेच
- अंबरनाथ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी अंबरनाथ येथून ०३.४३ आणि ४.०८ वाजता सुटणारी, कर्जत- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कर्जत येथून ०२.३० आणि ०३.३५ वाजता सुटेल आणि कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल जी कल्याण येथून ०४.३९ वाजता सुटेल.
- दक्षिण-पूर्व दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.३० वाजता सुटते. ईशान्य दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटेल.
- ईशान्य दिशेसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २३.१६ वाजता सुटेल.
हे ही वाचा:
Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?
लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule