वनविभागाच्या दुर्लक्षामुळे हरीण, काळवीट, मोराचं मांस मटण शिरूर आष्टी तालुक्याचा सलमान सुरेश धस यांच्या घरी जात आहे, असा दावा ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे यांनी केला आहे. सलमान खानला एका काळवीटाच्या शिकार केल्याप्रकरणी १० वर्षाची शिक्षा झाली तर सुरेश धसांनी काळवीट, अनेक मोराची तस्करी करावयास भाग पाडलं, याच्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करतील असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.
खोक्यासारखे अनेक माणसं धसाकडे आहे. सुरेश धसाचा लाडका कॉन्स्टेबल आष्टी पोलिसांत बसविलेला आहे. सुरेश धसांना महिला पुरविण्यासाठी बसविलेला आहे का? असा सवालचं नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. तसेच लैगिक शोषण करण्यासाठी कॉन्स्टेबल बसविलेला आहे का? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.
राज्यात, अभ्यासू, हुशार आणि प्रगल्भ मराठा समाजात नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व होते तोपर्यंत राज्य शांत होते, भावाभावा सारखे राहत होते, जरांगे सारखा बिनडोक माणूस समोरं आला, राज्याला दृष्ट लागलीय, जाती-पातीच्या पलीकडे विषय गेला असल्याचे नवनाथ वाघमारे यांनी म्हटले आहे. गुटखा माफिया, वाळू माफिया, मटका माफिया यांना जरांगेसह त्याचे मराठावाड्यातील सहकारी यांना पोसण्याचे काम करत असल्याने त्यातून ही गुन्हेगारी घडत आहे असेही वाघमारे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :
Uddhav Thackeray आणि Eknath Shinde आमने सामने येताच; कहीं पे निगाहें कहीं पे निशाना…
Maharashtra Budget 2025: यंदाच्या अर्थसंकल्पाने बळीराजाला काय काय दिले?
Follow Us