spot_img
Sunday, January 19, 2025

Latest Posts

परभणी हत्येप्रकरणी PI अशोक घोरबांड यांना निलंबित करून चौकशी होणार; CM Devendra Fadnavis यांचे वक्तव्य

परभणीमध्ये मंगळवारी १० डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली.

परभणीमध्ये मंगळवारी १० डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांची बुधवारी ११ डिसेंबरला परभणी जिल्हा बंद पुकारला गेला. या बंद दरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.

या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आता परभणीतील या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार घरून परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली जात होती. त्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी वक्तव्य करत चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.

परभणीतील घटनेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि मला बाळासाहेबांनी सांगितलं, मला माहिती मिळाली आहे की, लॉबिंग ऑपरेशन सुरु आहे. मी तात्काळ पोलिसांशी बोललो, त्यांना विचारलं कसलं ऑपरेशन सुरु आहे. तर पोलीस म्हणाले, व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांना आम्ही पकडतोय, मी त्यांना सांगितलं, त्याचा संदेश चांगला जात नाही. सहा वाजल्यानंतर कोणाला अटकही केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले हे सांगणं योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही”, असे फडणवीस म्हणाले.

या सर्व प्रकरणामध्ये एक तक्रार आलेली आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर केला आहे. निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत अशोक घोरबांड यांना निलंबित केले जाईल. त्यांना निलंबित करून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल, त्यांनी वाजवीपेक्षा अधिक बळाचा वापर केला आहे का, याची चौकशी होईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

आसमान से टपका खजूर मे अटका? नव्या सरकारची हरदासाची कथा मूळपदावर? 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात Jitendra Awhad आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss