spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

PM Modi in Mumbai Today: PM Modi यांचा महाराष्ट्र दौरा असणार तरी कसा? कोणाशी साधणार संवाद?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा आहे. आज पंतप्रधान मोदी मुंबई आणि नवी मुंबई येथे उपस्थित राहून महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. भारतीय नौदलाच्या जहाजांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी, आयएनएस वाघशीर या युद्धनौकांचं  उद्घाटन करून या नौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहेत. 5 डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उपस्थित होते. त्यानंतर आता नवीन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा मुंबईनगरीत आगमन होणार आहे. यासोबतच इस्कॉन मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत खारघर येथे होणार आहे.

मुंबईच्या नौदल गोदीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सकाळी साडेदहाच्या सुमारास आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या तीन युद्धनौकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या तीन युद्धनौकांचे लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे मंत्री तसेच आमदारांसोबत संवाद साधणार आहेत, तसेच त्यांना मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत नरेंद्र मोदी मंत्र्यांसह आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेले मोदी आज प्रामुख्याने पहिल्यांदाच महायुतीच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. हा संवाद दुपारी 12:15 ते 2:45 यावेळी दरम्यान असणार आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव गोदीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याशिवाय इतर कोणत्याही वाहनांना परवानगी असणार नाही. पंतप्रधानांच्या भेटीमुळे दक्षिण मुंबईत होणारी संभाव्य वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदारांना त्या परिसरात आपली वाहने घेऊन जाता येणार नाहीत. त्यामुळे आमदारांना गोदीमध्ये घेऊन जाण्यासाठी विशेष व्यवस्था विधानभवनात करण्यात आली आहे. यासोबतच, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास नवी मुंबईच्या खारघर येथील इस्कॉन मंदिराचे आज उद्घाटन होणार आहे,. इस्कॉन मंदिराच्या काही अंतरावर हेलिपॅड तयार करण्यात आले असून या हेलिपॅड वर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन वाजता येणार आहेत आणि खारघरमधील इस्कॉन मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

हे ही वाचा : 

मागील ५ वर्षात Best अपघातात किती नागरिक मृत्युमुखी? किती कर्मचारी निलंबित?

गृहमंत्री अमित शहांविषयीचे पवारांचे वक्तव्य राजकीय विद्वेषातूनच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss