पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM NARENDRA MODI) यांनी ‘मेरा युवा भारत’ (MERA YUVA BHARAT) पोर्टल लॉंच केले आहे. दिवाळीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना मोठी भेट दिली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘मेरा युवा भारत’ पोर्टल लॉंच करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबरला दिल्लीतील ‘मेरी माती मेरा देश’ (MERI MATI MERA DESH) अमृत कलश यात्रेच्या (AMRIT KALASH YATRA) समारोप समारंभात ‘मेरा युवा भारत’ पोर्टल व्हर्चुअली लॉन्च केले. ‘माती मेरा देश’ मोहिमेचा समारोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पद येथे अमृत कलशात माती अर्पण केली.
भारतातील तरुणांना विविध राष्ट्र निर्माण कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देण्यासाठी ‘मेरा युवा भारत’ हा अनोखा प्रयत्न असणार आहे. विकसित भारताच्या उभारणीत भारतातील युवा शक्तीला एकत्रित करण्याचा हा एक मार्ग असेल, असे नरेंद्र मोदी ‘मन की बात’ (MAN KI BAAT) या कार्यक्रमात म्हणाले होते.
‘मेरी माती मेरा देश’ अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मत मांडले. जेव्हा हेतू चांगला असतो आणि राष्ट्राची भावना प्रथम असते तेव्हाच परिणाम सर्वोत्तम होतो. आजादी का अमृत महोत्सव दरम्यान भारताने अनेक ऐतिहासिक कामगिरी केली. आज अधिक अमृत महोत्सव दरम्यान देशाने राजपथ ते कर्तव्यपथ हे अंतर कापले. ‘मेरी माती मेरा देश’ मोहिमेत अमृत कलश यात्रेचा समावेश आहे अमृत कलश यात्रे सह लाखांहून अधिक गावे आणि शहरी भागातील माती आणि तांदळाचे धान्य राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आणण्यात आले आहे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील तरुणांसाठी ‘मेरा युवा भारत’ प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आले.
हे ही वाचा :
WESTERN RAILWAY: ओव्हरहेड वायर तुटली, दुरुस्ती होऊनही गाड्या उशिराने