PM Narendra Modi LIVE: राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच, आज (शनिवार, ९ नोव्हेंबर) महायुतीची सभा अकोला विधानसभा मतदारसंघातून पार पडत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित आहेत. उपस्थितांशी संवाद साधत त्यांनी शेतकऱ्यांबाबत मोठे भाष्य केले. ‘आमचा संकल्प हा आहे की, शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की तो देशाच्या प्रगतीचा नायक म्हणून उदयास येईल,’ असे त्यांनी म्हंटले आहे.
“आपला अकोला कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. कापूस हा वस्त्रोद्योगाचा प्रमुख आधार आहे. परंतु आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना या शक्यतांचा लाभ अनेक दशकांपासून मिळाला नाही, ही परिस्थिती आता बदलत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उद्योग आणि पायाभूत सुविधा या दोन्हींना चालना देण्यात येत आहे.”
“आमचा संकल्प हा आहे की, शेतकरी स्वत: इतका खंबीर असला पाहिजे की तो देशाच्या प्रगतीचा नायक म्हणून उदयास येईल. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत आहोत आणि खर्च कमी करत आहोत. आम्ही पीएम किसान सन्मान निधी सुरू केला, महायुती सरकारने पाठिंबा दिला. परिणामी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळत आहेत.”
हे ही वाचा:
अमित शाहच्या बोलण्यातून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा मानस जाहीर; जयंत पाटील म्हणाले…