spot_img
Thursday, December 5, 2024
spot_img

Latest Posts

PM Narendra Modi Pune Visit: कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडणार पंतप्रधान मोदींची सभा, वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

Vidhansabha Elections 2024: विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे ७ दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक होणार आहेत. तर त्यापुढे तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा आणि सभांचा धडाका लावला आहे.  याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा पार पडणार आहे.

महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण महाराष्ट्रभरात सभा पार पडताना दिसून येत आहेत. आज १२  नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांची ही सभा सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. या निमित्ताने महायुतीच्या शहरातील उमेदवारांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या अनुषंगाने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा टिळक रोडवरील महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. त्यामुळे या भागातील रस्ते वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांकडून पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी पोलीस बंदोबस्त असणार आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. विशेष शाखा, गुन्हे शाखेची पथके, वाहतूक पोलीस, श्वान पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच, पुण्यामध्ये मोदींच्या सभेसाठी ड्रोन उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणानिमित्त मंगळवारी शहरात ड्रोन कॅमेरे तसेच पॅराग्लायडरच्या उड्डाणाला बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली चार अतिरिक्त पोलीस आयुक्त १३५ पोलीस निरीक्षक, ५७०  पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत.

हे ही वाचा:

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss