spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

शिर्डीच्या वरीला जाताना पोलीस सहायकचा ह्रदयविकारच्या झटक्याने मृत्यू, उरले होते फक्त १० किलोमीटर आणि…

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरवात देवदर्शनाने केली आहे. अनेकांनी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी केली. साईबाबांच्या दर्शनाला मोठी गर्दी पाहायला मिळाली. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात मुंबईतून शिर्डी साईबाबाच्या दर्शनासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे होत. या पदयात्रेत सहभागी झालेल्या पोलीस सहायक फौजदाराच्या ह्रदयविकारच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रफुल सुर्वे असे या पोलीस सहाय्यक फौजदाराचे नाव आहे.

प्रफुल सुर्वे अंधेरी पोलीस ठाण्यात पोलीस सहायक म्हणून कार्यरत होते. यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे. मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रफुल सुर्वे हे दरवर्षी अंधेरी ते शिर्डी पायी चालत जात असे. यंदाही आपली नियमित पायी वारी करण्यासाठी ते यात्रेत सहभागी झाले होते. मुंबई ते शिर्डी २४० किमी अंतर आहे. हे अंतर कापताना त्यांनी तब्बल २३० किमीपर्यंत पायी प्रवास केला. शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे १० किलोमीटरचे अंतर बाकी होते. त्याचवेळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सुर्वे यांच्या निधनाने साई पालखी मंडळ आणि पोलीस दलावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

Latest Posts

Don't Miss