spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

राहुल सोलापूरकरांच्या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी केली भूमिका स्पष्ट; म्हणाले, दोन्ही व्हिडिओत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत…

एका पॉडकास्टमध्ये अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केला. वादग्रस्त वक्तव्यानंतर चांगलाच गदारोळ उठला आहे. राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूरकर यांच्या पुण्यातील घरासमोरही शिवभक्तांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आता राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक जुना व्हिडीओ वायरल झाला आहे. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे, आता आंबेडकर अनुयायी देखील राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याबद्दल संतप्त झाले आहे. ठिकठिकाणी निदर्शने व अभिनेत्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. आता आंबेडकर अनुयायांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान राहुल सोलापूरकरने याबाबत माफी मागितली आहे. राज्यभरातून होत असलेला संताप पाहून राहुल सोलापूकर याने माफी मागितली. मात्र, त्यानतंर, त्यांच आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचं त्यांनी म्हटलें होतं. त्यामुळे, आंबेडकर अनुयायांनी संताप व्यक्त करत राहुल सोलापूकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत इशाराही दिला होता. त्यामुळे, अभिनेत्याने पुन्हा माफी मागितली. त्यांच्या घरासमोर शिवभक्त आणि आंबेडकरी अनुयायी संताप व्यक्त करत आहे. त्यामुळे पोलिसांनी राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आता यावर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

राहुल सोलापूरकर यांचे दोन्ही व्हिडिओ पुणे पोलिसांनी तपासले आहेत, या व्हिडिओमध्ये अजून तरी काही गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. सध्या त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त दिला आहे, कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो पोलीस बंदोबस्त आहे. गरज पडली तर राहुल सोलापूरकर यांना चौकशीसाठी बोलवून घेऊ, असे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी म्हटलं आहे. तसेच, अजून तरी राहुल सोलापूरकर यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती देखील अमितेशकुमार यांनी दिली. आक्षेपार्ह काही आढळलं तर गुन्हा दाखल होऊ शकतो, आत्तापर्यंत तपासलेल्या व्हिडिओतून गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही. लोकांना कायदेशीर बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु ठेवणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकरने याबाबत माफी मागितली आहे. राहुल सोलापूरकरने पॉडकास्टमधून शिवाजी महाराज यांच्या आग्रातील सुटकेबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, शिवभक्तांनी संताप व्यक्त केला, तर नेतेमंडळीहींनी अभिनेत्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज व खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील राहुल सोलापूकर यांच्या वक्तव्यावरुन संताप व्यक्त करत त्याला गोळ्या घालायला पाहिजे, असे म्हटले होते.

राज्यभरातून होत असलेला संताप पाहून राहुल सोलापूकर याने माफी मागितली. मात्र, त्यानतंर, त्यांच आणखी एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचं त्यांनी म्हटलें होतं. त्यामुळे, आंबेडकर अनुयायांनी संताप व्यक्त करत राहुल सोलापूकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत इशाराही दिला होता. त्यामुळे, अभिनेत्याने पुन्हा माफी मागितली.

हे ही वाचा:

संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन, सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय

GBS Update : ‘जीबीएस’ चा शिरकाव! पुण्यात आणखी एकाच बळी; २१ जण व्हेंटिलेटरवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss