पिंपरी चिंचवड मध्ये पोलीस आयुक्तांनी पोलिस स्टेशनच्या दारात ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. रात्री बारा वाजता भर रस्त्यात सांगवी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चार गुन्हेगार उपस्थित होते. या गुन्हेगारांकडून पोलिसांच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली. त्यामुळे ठाण्यासमोर गुन्हेगांरासोबत बर्थडे सेलिब्रेशन करणं पोलीस अंमलदाराला चांगलंच भोवलं आहे.
बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे. आता बर्थडे सेलिब्रेशनचं जंगी आयोजन करणाऱ्यांवर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेले अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे देखील तडकाफडकी निलंबन करण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं?
बुधवारचा दिवस संपताना अन् गुरुवारची सुरुवात होताना, प्रवीण पाटीलची मित्रमंडळी सांगवी पोलिस स्टेशन समोर जमू लागली. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर सहकारी ही सहभागी झाले. केक, आकर्षक फटाके, ड्रोन अशी सगळी सोय करण्यात आली. मग काय बाराच्या ठोक्याला प्रवीणसह मित्र मंडळी पोलिस स्टेशन समोरील रस्त्यावर आले. रस्त्याच्या मधोमध टेबल टाकून बर्थडे सेलिब्रेशन सुरु झालं.
टेबलवर केक ठेवून फटाके फोडण्यात आले. दोघांनी फटाक्यांची फायर गन बाहेर काढली दुसरीकडे स्काय शॉट आणि बॉम्ब फुटू लागले. ही आतिश बाजी बराच वेळ सुरू होती.एवढेच नव्हे तर या ‘सोहळ्या’साठी ड्रोनची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती. त्यांच्या या कृत्याची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली आहे. शिस्तभंग झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अगदी एखाद्या रीलस्टारला लाजवेल अशा प्रकारचं ड्रोनद्वारे बर्थडे सेलिब्रेशनचं चित्रीकरणही करण्यात आलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित झाला होता. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील पोलिस शिपाई प्रवीण पाटीलने हा प्रताप केला आहे. ज्यामुळं आख्ख्या पोलिस खात्याची मान शरमेने खाली गेली आहे.
ड्रोनने चित्रिकरण, अफलातून व्हिडीओ एडिटिंग
दोघांनी फटाक्यांची फायर गण बाहेर काढली, दुसरीकडे स्काय शॉट आणि सुतळी बॉम्ब फुटू लागले. ही आतषबाजी बराचवेळी सुरु होती. जमाना रील्सचा आहे म्हटल्यावर याचं चित्रीकरण होणार नाही असं कसं होईल. मग हा सगळा कार्यक्रम ड्रोनद्वारे चित्रित करण्यात आला. भलेभले रीलस्टार सुद्धा लाजतील इतकं अफलातून एडिटिंग ही करण्यात आलं. मग काय दिवस उजाडताच हे व्हिडीओ प्रवीण अन् सहकाऱ्यांसह मित्र मंडळींच्या स्टेट्सवर अपलोड होऊ लागले. व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर पोलिसांवरती टीका होऊ लागली होती. अशातच त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारला आहे.
हे ही वाचा:
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींची निराशा; २१०० रुपयांसाठी अजून वाट पाहवी लागणार
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.