Friday, April 26, 2024

Latest Posts

Gautami Patil च्या विरोधात दाखल झाली पोलीस तक्रार

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे.

लग्नाचा कार्यक्रम असो, वाढदिवसाचा कार्यक्रम असो की गावचा तमाशा, खासगी बैठका असो की अन्य कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची चलती आता सगळ्याच ठिकाणी बघायला मिळत आहे. आता गौतमी इतकी फेमस झाली आहे की , तिचे नृत्य ठेवल्याशिवाय गावचा एकही कार्यक्रम होत नाही. गौतमी आणि गर्दी हे ठरलेलं समीकरण आहे. गौतमी जिथे जातं तिथे गर्दी होतेच होते. आच एक गौतमीचा कार्यक्रम हा सोलापूर मध्ये आयोजित करण्यात आला होता. अश्यातच आपल्या दिलखेच अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील अडचणीत सापडली आहे.

गौतमी पाटील हीच कार्यक्रम सोलापुरातील बार्शी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता. राजेंद्र भगवान गायकवाड यांनी हा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु आयोजकांना हा कार्यक्रमाचे आयोजन कारण आता चांगलंच महागात पडले आहे. दिनांक १२ मे रोजी बार्शीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र गौतमी पाटील हि ७ ऐवजी १० वाजता स्टेजवर आल्याने कार्यक्रमाची वेळ संपली आणि पोलिसांनी तिचा हा कार्यक्रम बंद पाडला. या कार्यक्रमासाठी ठरलेल्या मानधनापेक्षा मला वेठीस धरून गौतमीने अवांतर पैसे घेतले. तसेच नियोजित कार्यक्रमाला उशिरा येऊन माझी बदनामी करण्याच्या हेतूने फसवणूकही केली, असं तक्रारदार गायकवाड याने आपल्या तक्रारीत म्हंटलय. त्यामुळे गौतमी पाटील हिची कोंडी झाली आहे.

गौतमीच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बार्शी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पहिल्यांदाच गौतमीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने गौतमीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तसेच याच प्रकरणात सोलापुरात तिचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अधिकच खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसानी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याचे गायकवाड यांना लेखी कळवले होते. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी थेट कार्यक्रम घेत नियमांचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. भादवि कलम १८८ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ , ३७(३) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

करिअरमध्ये आईची भक्कम साथ…, सईने सांगितलं आईसोबतचे नातं

क्रांती रेडकरने पतीवर लावलेले आरोप फेटाळून लावले, काय म्हणाली क्रांती

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोण डीके शिवकुमार की सिध्दरमैया? दिल्लीत फैसला | Karnataka Election 2023

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss