spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Sushil Karad विरूद्धच्या खटल्यात पोलीसांचा अहवाल दाखल

वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांचे नावे असलेली फर्म सानिया ट्रेडर्स व त्यांचे पत्नीचे नावे असलेली फर्म तन्वी इंटरप्राइझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने सन २०२०-२०२१, २०२१-२०२२,  २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये व्यापा-याकडील होणारी वसुली स्वतःच्या व यातील फिर्यादी पत्नीचे नावे वळती करून घेवून रक्कम रु. १ कोटी ८ लाख रूपयांचा अपहार केल्याचा सुशील कराड यांनी दि. १९ जुलै २०२४ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.

वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांचे नावे असलेली फर्म सानिया ट्रेडर्स व त्यांचे पत्नीचे नावे असलेली फर्म तन्वी इंटरप्राइझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने सन २०२०-२०२१, २०२१-२०२२,  २०२२-२०२३ या आर्थिक वर्षामध्ये व्यापा-याकडील होणारी वसुली स्वतःच्या व यातील फिर्यादी पत्नीचे नावे वळती करून घेवून रक्कम रु. १ कोटी ८ लाख रूपयांचा अपहार केल्याचा सुशील कराड यांनी दि. १९ जुलै २०२४ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. तेंव्हापासून आजतागायत फिर्यादी व तिचा पती फरार आहेत. त्यांनी न्यायालयातुन जामीनही घेतलेला नाही अथवा पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजर ही झालेले नाहीत असे असताना प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी महिलेने जबरदस्तीने गाडया, सोने व प्लाँट जागा खरेदीखतान्वे लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज एम आय डी सी पोलिस स्टेशन सोलापूर येथे दाखल केलेला होता. परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असल्याने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिलेले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस महासंचालकाकडे तक्रार दाखल केली त्याचा तपास परळी, बीड पोलिसांनी केला. त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे व तिने अपहाराच्या गुन्हयास शह देण्यासाठी तक्रार केल्याचे निरीक्षण नोंदवून पोलीसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे.

सदर प्रकरणात न्यायालयाने पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून एम.आय.डि.सी.पोलीस स्टेशन, सोलापूर यांना तपास करून आठ दिवसांत त्यांचा अहवाल मे.कोर्टात सादर करण्याचा आदेश पारित केला होता त्याप्रमाणे पोलीसांनी तपास करून फिर्यादी महिलेचे गाड्या, सोने व प्लाँटजागा हे आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतल्याचे तसेच फिर्यादीचे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना ही परळी, बीड येथे घडल्याने एम.आय.डि.सी.पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचा अधिकार नसल्याने फिर्यादीचा तक्रारी अर्ज निकाली काढल्याचा अहवाल मे.कोर्टात दाखल केला. यात सुशील कराड तर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये बीड पोलीसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे दाखल केली आहेत.

यात आरोपीतर्फे मुद्दे मांडताना पोलीसांनी दाखल केलेल्या तपासणी अहवालासोबत फिर्यादीचा घेतलेल्या जबाब दाखल केला असून त्यामध्ये पोक्सोच्या घटनेबाबत व सोलापूर मध्ये घडलेल्या कथीत घटनेचा उल्लेख केला नसल्याचे मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले त्यावर सुनावणी करिता उद्या तारीख नेमलेली आहे.

हे ही वाचा : 

घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत

देशाला पहिले खो-खो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या कर्णधारांचे फडणवीसांनी केले विशेष कौतुक, ..ही विजयश्री अविस्मरणीय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss