Thursday, April 25, 2024

Latest Posts

पोलिसांचा व्हिडीओ अंबादास दानवेंकडून ट्वीट, म्हणाले…

समृद्धी महामार्गाची निर्मिती राज्याची भरभरून समृद्धी व्हावी म्हणून करण्यात अली आहे. या महामार्गाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची प्रचंड पप्रमाणात अपेक्षा आहे.

समृद्धी महामार्गाची निर्मिती राज्याची भरभरून समृद्धी व्हावी म्हणून करण्यात अली आहे. या महामार्गाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची प्रचंड पप्रमाणात अपेक्षा आहे. परंतु पोलिसांच्या एका व्हायरल व्हिडिओत अनेकांची ही अपेक्षा भंग होताना दिसत आहे. या महामार्गावर पोलिसांचीच समृद्धी होत आहे असे म्हणण्यास काही गैर नाही. कारण समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडवून, त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्वीट करत केला आहे. तर पोलिसांकडून कशाप्रकारे वसुली सुरु असते याचा व्हिडिओ देखील दानवे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे

समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. कमी वेळात जास्त अंतर कापण्यासाठी महामार्ग फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा होती परंतु याच महामार्गावरील पोलिसांचा व्हिडीओ दानवेंनी शेअर करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.“समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल अशी वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी ‘समृद्धी’ येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!..” असे दानवे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. तसेच अंबादास दानवेंच्या आरोपांनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक अनिता जमादार यांनी माध्यमांना दिली आहे.

अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत एक पोलिस एका वाहनचालकाकडून काही तरी घेऊन खिशात घालत असल्याचे दिसत आहे. तसेच, दुसऱ्या ठिकाणी दोन पोलिस असेच करत असल्याचे दिसून आले. मोठ्या वाहनांचे चालक किंवा क्लीनर यांना खाली उतरवून त्यांच्याकडून काहीतरी घेऊन ते खिशात घातल्याचेही यात दिसत आहे. जवळपाच चार ते पाच जणांना रोखून अशी कृती पोलिस करीत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांचीच समृद्धी होत असल्याचा गंबीर आरोप दानवे यांनी केला आहे.

हे ही वाचा:

संजय शिरसाट यांना पोलिसांकडून दिलासा

Gautami Patil चा कार्यक्रमाचे आयोजन करणे पडले महागात…

South Actor Harish Pengan यांनी वयाच्या ४९ वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss