महाराष्ट्रात सध्या एका IAS प्रशिक्षणार्थी अधिकारीचं नाव चर्चेत नाही तर वादात आलंय. पूजा खेडकर प्रकरण म्हणजे केवळ UPSC च नाही तर संपूर्ण समाजाची फसवणूक आहे. कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली नायायालयाने नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्यासंबंधी खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन याचिका मंजूर करण्यास नकार दिला आहे. यासाठी न्यायालयाने यूपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा मनाली जाते असं कारण दिले आहे. प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेली घटना ही केवळ एका संस्थेविरुद्धच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर समाजाविरुद्ध फसवणूक दर्शवते असेही न्यायालयाने नमूद केले. या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे. नायायालयाने अटकपूर्व याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला आणि खेडकर याना दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेतले.
UPSC ने जुलै महिन्यात पूजा खेडकर विरोधात कारवाईला सुरुवात केली. यामध्ये खोटी ओळख दाखवून नागरी सेवा परीक्षा दिल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहिता, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. मात्र पूजा खेडकरने तिच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले आहेत.
हे ही वाचा:
रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून Aditi Tatkare आणि Bharat Gogawale यांच्यात चुरशीचा सामना
मंत्रिमंडळातून भुजबळांना स्थान न दिल्याने ओबीसी नेते Laxman Hake आक्रमक