गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. तब्बल १९ दिवस उलटूनही आरोपी मोकाट आहेत. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिकी कराड असल्याचे बोललं जात असून तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्याविरोधात बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, संघटनांनी शनिवारी शहरात विराट मोर्चा काढला. या मुद्यावरून रान पेटलेले असतानाच आता आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्याने दुसराच वाद उभा झाला. त्यातच भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले होते. यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
अभिनेत्री यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला, त्याचा निषेध केला आणि माफी मागण्याचे आवाहन केले. तर सुरेश आण्णांनी माफी मागण्यास नकार दिला. आता आज प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितल्याचे समोर येत आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे. कालच त्यांनी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची आणि समाज माध्यमांना वेसण घालण्याची मागणी केली होती. सुरेश धस यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने आता हा वाद पेटतो की येथेच त्यावर पडदा पडतो याविषयीचा खल सुरू असतानाच प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याचे समोर येत आहे. या भेटीनंतर त्यांनी काय मागणी केली. त्याच्यावर त्यांना काय आश्वासन देण्यात आले हे लवकरच समोर येईल.
काय म्हणाले होते धस?
मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर टीका करताना सुरेश धस यांनी परळीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमावर टिप्पणी केली होती. त्यांनी कराड यांचे विविध कारनामे सांगत असताना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचा उल्लेख केला. त्यावेळी त्यांनी प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले. ‘सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच पसार करावा’ असा चिमटा धस यांनी धनंजय मुंडे यांना काढला होता.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.