तालुक्यातील पिंपळगाव येथील तिर्थक्षेत्र दत्तमंदिर परीसरात प.पु. गोवत्स बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी पिंपळगाव मंदिरात पत्रकार परिषद घेऊन शिव पुराण कथा सोहळ्याची पूर्ण तयारी झाली असल्याची माहिती दिली. तपस्वी बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांच्या पुढाकाराने होत असलेल्या ६ मार्च ते १३ मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा, श्री १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ व नाम संकिर्तन सोहळ्याची पूर्ण तयारी झाली असून भव्य दिव्य अशा धार्मिक कार्यक्रमासाठी दररोज दीड लाख भाविक भक्ताची उपस्थिती राहणार आहे.त्यांच्या राहण्याची व जेवण्याची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे या साधुसंतांचा कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी या भागातील लोकप्रिय आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी आज भेट दिली त्याचबरोबर हिंगोली लोकसभेचे खा. नागेश पाटील आष्टीकर, हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, भागवत देवसरकर, नांदेड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर शफकत आमना मॅडम, नायब तहसीलदार काकडे गट विकास अधिकारी कैलास बळवंत तामसा पोलीस स्टेशनचे खेडकर इत्यादींनी भेट देऊन या भागाची पाहणी केली.
आलेल्या सर्व साधुसंतांची व भाविकांची पूर्ण सोय करण्यात येईल असे सांगितले तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथे दि. ६ मार्च ते १३ मार्च या कालावधीत भव्य महाशिवपुराण कथा प्रवक्ते अनंत विभूषित मज्जगदुरु द्वारकाचार्य मलुकपीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज रेवासा वृंदावन धाम उत्तर प्रदेश यांच्या मधुर वाणीतून हा सोहळा होणार या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महा-राज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जवळपास पूर्णच तयारी झाली अवघ्या दोन दिवसांवर कार्यक्रम येऊन ठेपला आहे हजारो नागरिक मदतीला धावून येत आहेत. यासाठी नुकतीच तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथील परमपूज्य गोवत्स तपस्वी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्तमंदिर येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती सांगितली दरम्यान कोण कोणत्या गोष्टीवर काळजी घ्यावी या संदर्भात चर्चा करण्यात आली त्या चर्चेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे दोन बस आगार डेपो व ठिकठिकाणी पार्किंग सुविधा, भाविक भक्तांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आंघोळीच्या बाथरूम व फिरते शौचालयासह जेवण व्यवस्थ सह संपूर्ण कार्यक्रमावर पोलीस प्रशासनाची ड्रोन कॅमेऱ्याने नजर असणार आहे.
त्याचबरोबर परिसर हा प्लास्टिक मुक्त राहणार आहे भव्य साधुसंत महा कुंभमेळाव्यास जिल्हा सह इतर राज्यातून मोठ्या संख्येने साधुसंत महंत व भाविक भक्त येणार आहेत त्या दरम्यान या सर्वांची राहण्याची जेवणाची व्यवस्था कमी पडणार नाही यासाठी सर्व कार्यकत्यांनी व प्रशासकीय अधिकारी आपली जबाबदारी समजून हा कुंभ मेळावा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न करावे या सोहळ्याला देशभरातून संत महंत उपस्थित राहत असल्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त उपस्थित राहणार आहेत त्यासाठी गर्दी त्य ठिकाणी होऊ नये म्हणून १५० एकर जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. शिव महापुराण कथा सस्तंग सोहळ्याला सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठाचे मठाधिपती तपस्वी बालयोगी गुरुवर्य व्यंकट स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश