spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त CM Fadnavis यांची चंद्रपूर येथे उपस्थिती

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज १० जानेवारीला पहिल्यांदाच चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते . राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र मा. सा. कन्नमवार यांची आज १२५ वी जयंती आहे. या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरला आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर येथे लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती सोहळा संपन्न झाला. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेऊन व्रतस्थ जीवन जगलेले द्रष्टे नेते म्हणजे कर्मवीर दादासाहेब कन्नमवार, त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आरोग्य केंद्र उभारण्याची संकल्पना मांडली तसेच चंद्रपूर आणि विदर्भात शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी काम करत आपल्या जीवनामध्ये अनेक मानके तयार केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यासोबतची आपली नाळ अधोरेखित करत या जिल्ह्याच्या विकासातील सर्व अडचणी दूर करणार असे आश्वस्त केले. यासोबतच लोकनेते कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांच्या कार्याचा गौरव करणारा ग्रंथ राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या माध्यमातून निर्माण करणार असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मवीर मा.सां. कन्नमवार गौरव स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह माजी मंत्री शोभाताई फडणवीस व इतर मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss