spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

पुण्यातील PSI ने संपवलं आयुष्य; लोणावळ्यात सापडला मृत्यूदेह, कारमध्ये डायरी

पुण्यातील एका उपनिरीक्षकाने लोणावळ्यात जाऊन टोकाचं पाऊल उचलल्याची घटना सामोर येत आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईन्टलगत त्यांनी झाडाला गळफास घेतला. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. अण्णा गुंजाळ असं या पोलिस उपनिरिक्षाकांचे नाव आहे. त्यांनी आत्महत्या का केली याबाबतचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अण्णा गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते तीन दिवसांपासून कर्तव्यायवर नव्हते. तसेच त्यांच्यासोबत संपर्कही होत नव्हता. मात्र, आज त्यांचा शोध लागला तेव्हा त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं.

लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर त्यांची गाडी सुद्धा आढळलेली आहे, या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं असू शकतं. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पाँईटवर असलेली गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता, या कारमधील डायरीत त्यांनी मृत्यूपूर्व काही लिहून ठेवले आहे का, याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे. अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा :

Latest Posts

Don't Miss