spot_img
Saturday, January 11, 2025

Latest Posts

Public Movement Against EVM: वंचित बहुजन आघाडी EVM विरोधात जनआंदोलन उभारणार!

राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. महायुतीचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले असून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यात आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ५ डिसेंबरला संध्याकाळी ५ वाजता होणार असल्याचं महायुतीकडून जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे.

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाच्यावतीने ईव्हीएम (EVM) विरोधात जनआंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम (EVM) विरोधी जनआंदोलन पुकारले आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून टप्प्या-टप्प्याने हे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान राज्यात ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांनी राज्यातील मतदारांना व्हिडिओच्या माध्यमातून ईव्हीएम (EVM) विरोधातील स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम (EVM) विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. ते ईव्हीएम (EVM) विरोधात न्यायालयीन लढाईही लढत आहेत. ईव्हीएम वापरातील अनेक घोटाळे त्यांनी पत्रकार परिषदेतून मांडले आहेत. वंचित बहुजन आघाडीने ईव्हीएमविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या विभागात ही मोहीम राबवणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन ईव्हीएम हद्दपार करण्यासाठी हातमिळवणी करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss