पुण्याच्या स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर सकाळी अत्याचार करण्यात आला. अत्याचार करणारा नराधम दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांकडून सध्या कसून शोध घेतला जात आहे. आधी पुणे पोलिसांची आठ पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होती. मात्र आता पथकाची संख्या आठ वरून १३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही पथके चारही बाजूने रवाना करण्यात आले आहे. बुधवारी गुन्हे शाखेने आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मित्र मैत्रिणींची चौकशी केली. त्याच्या मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली.
दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असा धोशा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावला होता. तो यासाठी मला सतत फोन करुन त्रास द्यायचा, असे या आरोपी दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीने सांगितले. यावरून असे समजते कि दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, या आधीही त्याने महिलाना त्रास दिला असेल, असा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत आरोपीच्या १० मित्र मैत्रिणींची चौकशी केली. या १० मित्र मैत्रिणींन कडून दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा होता. पोलिसांनी शिरूरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. त्यांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्या आई वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलवून घेतले आहे.
नेमके प्रकरण काय?
दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे स्वारगेट डेपोच्या आवारात उभ्या असणाऱ्या तरुणीला भुलवून एका शिवशाही बसमध्ये नेले होते. ही तरुणी बसमध्ये चढल्यानंतर दत्तात्रय गाडे याने दार बंद करुन घेतले आणि तिच्यावर अत्याचार केले होते. दत्तात्रय गाडे याने एकवेळा नव्हे तर दोनवेळा तरुणीवर बलात्कार केला. ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पीडित तरुणी ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती. ती मंगळवारी फलटणमधील आपल्या गावी जाण्यासाठी निघाली होती. या 26 वर्षांच्या तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे पुण्यासह राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत.
हे ही वाचा: