पुण्यातून फलटणला जाण्यासाठी ‘ती’ स्वारगेट बसस्थानकात आली. जिथे नेहमी गाडी लागते, त्या फलाटावरील खूर्चीवर ती बसली होती. आरोपी तिच्याजवळ आला. गोड बोलत ओळख करून घेतली आणि नंतर तिकडे बस लागलेली आहे, म्हणत शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला. या घटनेमुळे पुणेच नाही तर संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. ही घटना मंगळवारी २५ फेब्रुवारीला पहाटे साडेपाच वाजता घडली. अश्या रहदारीच्या जागेवर अशी घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या पीडित तरुणीवर एकदाच नव्हे तर दोन वेळा आरोपीने बलात्कार केला. आरोपीचा नाव दत्तात्रय गाडे असं आहे. दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा असून तो फरार आहे. आधी पुणे पोलिसांची आठ पथके दत्तात्रय गाडे याचा शोध घेत होती. मात्र आता पथकाची संख्या आठ वरून १३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही पथके चारही बाजूने रवाना करण्यात आले आहे. बुधवारी गुन्हे शाखेने आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मित्र मैत्रिणींची चौकशी केली. त्याच्या मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. आरोपी एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. नेमका काय आहे प्रकरण बघुयात.
पीडित तरुणी ही पुण्यात कमला होती. घटनेच्या दिवशी म्हणजेच ती सकाळी साडेपाच ते पावणेसहा दरम्यान ही तरुणी फलटणला आपल्या गावी निघाली होती. त्यासाठी ही तरुणी स्वारगेट डेपोत आली. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीच्या आजुबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ही तरुणी ज्याठिकाणी बसली होती, तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती. आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर हा व्यक्ती निघून गेला. त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीशी गोड बोलून ओळख काढली. कुठे जाते ताई? असे त्याने तरुणीला विचारले. त्यावर तरुणीने आपल्याला फलटणला जायचे असल्याचे सांगितले. त्यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की, सातारची बस तिकडे लागली आहे. त्यावर तरुणी म्हणाली की, सातारची बस इकडेच लागते म्हणून मी इथे बसलेय. पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागली आहे, मी तुला तिकडे घेऊन जातो, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत गेली. ही मुलगी बसजवळ पोहोचली तेव्हा अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीने म्हटले की, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्चने चेक कर. त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला. अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.
या पीडित तरुणीच्या वैधकीय तपासणीचा अहवाल समोर आला आहे. यात आरोपीने पीडितेवर एकवेळा नव्हे तर दोनवेळा बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना सुपूर्द केलेल्या तरुणीच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून ही बाब स्पष्ट झाली आहे. पीडित तरुणी ही पुण्यात परिचारिका म्हणून काम करत होती.
गन्हे शाखेने आरोपी दत्तात्रय गाडे याच्या मित्र मैत्रिणींची चौकशी केली. त्याच्या मैत्रिणीला भोरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आले. त्यावेळी तिने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली. दत्तात्रय गाडे मला सारखे फोन करायचा आणि मेसेज करायचा. या दोघांची आणखी एक मैत्रीण होती. तिच्याशी पॅचअप करुन दे किंवा तिची भेट घालून दे, असा धोशा दत्तात्रय गाडेने माझ्याकडे लावला होता. तो यासाठी मला सतत फोन करुन त्रास द्यायचा, असे या आरोपी दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीने सांगितले. यावरून असे समजते कि दत्तात्रय गाडेने महिलेवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी, या आधीही त्याने महिलाना त्रास दिला असेल, असा संशय पोलिसांना आहे. गुन्हे शाखेने बुधवारी रात्रीपर्यंत आरोपीच्या १० मित्र मैत्रिणींची चौकशी केली. या १० मित्र मैत्रिणींन कडून दत्तात्रय गाडे हा मूळचा शिरूरचा होता. पोलिसांनी शिरूरमधील त्याच्या घरी बंदोबस्त लावला आहे. त्यांनी आरोपी दत्तात्रय गाडे याच्या आई वडिलांना आणि भावाला पोलिसांनी चौकशीसाठी पुण्यात बोलवून घेतले आहे.
नराधम आरोपी दत्ता गाडे हा एक सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर तो एका प्रमुख पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचीही माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे याचा राजकीय व्यक्ती आणि पोलिसांशी संपर्क असायचा अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. त्यामुळेच दत्तात्रय गाडे याच्यात स्वारगेट डेपोसारख्या मध्यवर्ती ठिकाणी तरुणीवर बलात्कार करण्याची हिंमत आली असावी, अशी चर्चा आता सुरु आहे. दरम्यान राजकीय फ्लेक्सवर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा फोटो असल्याचं चित्र आहे, तर दत्ता गाडे याच्या व्हाट्सअप प्रोफाईलला शिरुरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो असल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. माऊली कटके हे राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत. माऊली कटके यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना तिर्थयात्रा घडवल्या. त्यामधे आरोपी गाडे सहभागी झाला होता अशी माहिती आहे. आमदार माऊली कटके यांनी मात्र दत्तात्रय गाडेशी आपला कोणताही संबंध नसून आपण त्याला ओळखत नसल्याचं म्हटलं आहे. हा प्रकार रहदारीच्या जागेवर घडला आहे. असं असतांना महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकीय पक्षात सहभागी असल्याची चर्चा असलेला दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या हाती कधी लागणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
हे ही वाचा: