spot_img
spot_img
Monday, September 25, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

पिंपरी चिंचवड मधील भीषण आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

पुणे (Pune) शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पण काही दिवसांपासून पुण्यात अनेक धक्कादायक घटना वाढत आहेत.

पुणे (Pune) शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पण काही दिवसांपासून पुण्यात अनेक धक्कादायक घटना वाढत आहेत. येथे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशीच एक घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये घडली आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड मधली चिखली भागात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. ३० ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या भीषण आगीत एकाच घरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला जीव वाचवण्यासाठी वेळ न मिळाल्याने त्याना जीव गमवावा लागला. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी पोहचले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी आग नियंत्रित आणली असून आता कुलिंगचे काम सुरु आहे.

या आगीत चिमणाराम चौधरी, ज्ञानुदेवी चौधरी, सचिन चौधरी (वय १०) भावेश चौधरी (वय१५) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पुण्यातील चिखली परिसरातील सचिन हार्डवेअर या दुकानाला बुधवारी पहाटे आग लागली होती. या हार्डवेअर दुकानात चौधरी यांचं संपूर्ण कुटुंब राहत होत. लागल्या या भीषण आगीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

चिखली भागातील सचिन हार्डवेअर या दुकानाला नेमकी कशी आग लागली? याच कारण अद्याप समजले नाही आहे. पण दुकानातील ही आग शॉटसर्किटमुळे लागली असावी असे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाने ही आग नियंत्रणात आणली आहे.

Latest Posts

Don't Miss