spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

पुणेकरांसाठी एक मोठी गुड न्यूज, ‘हा’ बहुचर्चित पूल होणार…

पुणे (Pune) शहरातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. वाहतूक कोंडी (Traffic congestion) टाळण्यासाठी विविध ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत.

पुणे (Pune) शहरातील पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम सुरु आहे. वाहतूक कोंडी (Traffic congestion) टाळण्यासाठी विविध ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे मेट्रो (Pune Metro) सुरु झाल्यामुळे अनेकांनी मेट्रोने प्रवास सुरु केला आहे. त्यानंतर चांदणी चौकातील (Chandni Chowk) पूल सुरु झाल्यामुळे त्या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. शहरातील सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) तीन पूल तयार करुन वाहतूक कोंडी सोडवण्यात येणार आहे. तसेच पुणे येथील प्रतिक्षेतील बहुचर्चित पुलाचे काम वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे मुदतीपूर्वी हा पूल सुरु होणार आहे.

पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) चौकात दुमजली डबल डेकर पुलाचे (Double decker bridge) काम वेगाने सुरू आहे. या पुलाचे काम मुदतीपूर्वी करण्याचे आदेश पुणे मेट्रोपॉलिटन रीजन डेवलपमेंट अथॉरिटी (PMRDA) कडून देण्यात आले आहे. हा पूल नोव्हेंबर २०२४ मध्ये पूर्ण होणार होता. आता तो ऑगस्ट २०२४ करण्याचे सांगितले आहे. चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी हे काम लवकर करण्याचे सांगितले होते. त्यानंतर यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.

कोरोना काळात एप्रिल-मे २०२० दरम्यान पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यात आला होता. त्यानंतर पीएमआरडीएने याठिकणी दुमजली पूल बांधायची घोषणा केली होती. पुलाच्या पहिल्या मजल्यावर दुचाकी-चारचाकी वाहने धावणार तर त्यावरून मेट्रो धावणार आहे. हिंजवडी (Hinjewadi ) ते शिवाजीनगर (Shivajinagar) मार्गावर २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. या ठिकाणी पुणे विद्यापीठात दुमजली पूल केला जात आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. हे काम एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करा, त्यासाठी राज्य सरकारकडून सर्व परवानगी आणि मदत दिली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे ही मेट्रोही लवकर सुरु होणार असण्याची अपेक्षा आहे. सिंहगड रस्ता परिसरात वाहतूक कोंडी नेहमीची आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता पुणे महापालिकेतर्फे दांडेकर पूल चौकात पूल बांधण्यात येणार आहे. तसेच नगर रस्त्यावर पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हे ही वाचा: 

Asia Cup 2023 IND vs NEP, आज भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये आमना – सामना, पहा दोन्ही संघाचे प्लेइंग ११…

पंकजा मुंडे यांचा सुरु होणार शिवशक्ती परिक्रमा दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss