spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील गणेश उत्सवात ड्रोन कॅमेऱ्याची नजर

पुण्यातील गणेश उत्सवाला मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशउत्सवातील सुरक्षेसाठी शहरात पुढील ११ दिवस शहरात ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तू उडवण्यास बंदी घालण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

पुण्यातील गणेश उत्सवाला मोठ्या आनंदात आणि उत्साहात सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुण्यातील गणेशउत्सवातील सुरक्षेसाठी शहरात पुढील ११ दिवस शहरात ड्रोन आणि इतर उडणाऱ्या वस्तू उडवण्यास बंदी घालण्याचा निर्णय देण्यात आला आहे. उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरात भाविकाच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) यांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर, हँडग्लायडर, हॉट एअर बलून इत्यादींचा वापर दहशतवाद्यांकडून दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ शकतो.

लोक किंवा व्हीआयपी लोकांमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊ शकते म्हणून आजपासून ते २९ सप्टेंबर पर्यंत या वस्तूंच्या उड्डाणांवर शहरात निर्बंध घालण्यात येणार आहेत. शहर पोलीस पाळत ठेवण्यासाठी वापरत असलेल्या ड्रोन आणि उडत्या वस्तूंना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. शहरात या कायद्याचे उलंघन केल्यानंतर भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम १८८ नुसार शिक्षा केली जाईल, असे आदेश देण्यात आले आहेत. अधिकार्‍यांना जनजागृतीसाठी पोलीस स्टेशन आणि इतर आस्थापनांना अधिकृत आदेश देण्यास सूचित करण्यात आले आहे. उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक शहर परिसरात भेट देतात. त्यामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे.पुण्यातील उत्सवात १८०० ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. उत्सवादरम्यान दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात दोन दहशतवादी सापडले होते. कोथरुडसारख्या परिसरात चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोघांचा संपर्क ISIS सारख्या देशविरोधी संघटनांशी संपर्क असल्याचं समोर आलं होत. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे बंदूक आणि स्फोटकं संपली होती. बॉम्ब बनवण्याचं साहित्य आणि क्रिया लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात हे दोघे राहत होते. त्यानंतर पुण्यातील कोंढवा परिसरातूनच एका भूलतज्ञ असणाऱ्या डॉक्टरला ISIS मध्ये भरती करुन घेतो या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे यंदा कडेकोट बंदोबस्त कऱण्यात येणार आहे.

 

हे ही वाचा: 

राजू शेट्टी यांनी केली सरकारवर टीका

कुणबी नोंदी शोधण्यासाठी गेलेले पथक रिकाम्या हाताने परतले

FOLLOW US

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss