Friday, March 29, 2024

Latest Posts

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण लागली आग

पुण्याच्या टिंबर मार्केट गोडाऊनला मोठी आग लागली आहे. या आगीत नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांच्या नुकसानीबरोबर तेथे काही जीवित हानी झालेली हि मोठी बाबा लक्षात घेतली पाहिजे.

पुण्याच्या टिंबर मार्केट गोडाऊनला मोठी आग लागली आहे. या आगीत नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नागरिकांच्या नुकसानीबरोबर तेथे काही जीवित हानी झालेली हि मोठी बाबा लक्षात घेतली पाहिजे. अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत तर जवळच्या शाळेतील बाकं आणि मुख्यध्यापकांच्या खोलीतील सामान जळून खाक झाले आहे. पहाटे साधारण चारच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच तास लागले.

टिंबर मार्केटचा हा परिसर मोठा आहे. शेजारी लोकवस्तीदेखील आहे. या आगीमुळे शेजारी असलेल्या लोकवस्तीत खळबळ उडाली होती. साखर झोपेत असलेले नागरीक आगीचे लोट पाहून आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांचा आवाज ऐकून जागे झाले. या आगील सुमारे आठ घरांचं मोठं नुकसान झालं आहे. डोळ्यादेखत 8 कुटुंबियांचा अख्खा संसार उद्वस्त झाला आहे. घरातील सगळं सामान जळून खाक झालं आहे. जवळच असलेल्या एका चार मजली इमारतीमधील (मातृछाया ) खिडकीच्या काचा आगीच्या तीव्रतेने फुटल्या व खिडकीचे कापडी पडदे, टेरेसवर असणारे पत्र्याचे शेडदेखील जळून खाक झाले आहेत. पुण्यातील लाकडी सामानाची मोठी बाजारपेठ असलेल्या टिंबर मार्केटमध्य़े आग लागल्याने किरकोळ विक्रेत्यांचंदेखील नुकसान झालं आहे. पुण्यातील टिंबर मार्केटमधील गोडाऊनला भीषण आग लागली . आग लागल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. आग खूपच भीषण असल्यामुळे शेजारील ४ घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी आली पण अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. यात सुदैवाने कोणाही दगावला नाही.

‘पाच मोठी गोडाऊन आहेत. डोळ्यादेखत सगळं खाक होताना बघितलं. सुमार पाच तास आग आटोक्यात येत नव्हती. आमच्यातील अनेकांच्या घरात नुसता धूर दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या 8 कुटुंबाच्या दाणादाण झाला आहे. घरातील सगळं सामान विखुरलेल्या अवस्थेत आहे. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. तेथील राहणाऱ्या नागरिकांच्या या गोडाऊनच्या शेजारीच आमचं घर आहे. आमचा मुलगा पहिल्याच खोलीच झोपला होता. त्याचवेळी संपूर्ण आग घरात आली. मुलगा सुदैवाने बचावला मात्र घरातील एकही सामान व्यवस्थित नाही. आम्ही सगळे घरात झोपलो होतो. बाहेरुन अनेकांचा आवाज आला आणि आम्ही खडबडून जागं झालो. बघितलं तर अर्ध घर जळालं होतं’, असं नागरिक सांगतात.

हे ही वाचा:

क्षिती जोग दिसणार रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये

प्रकाश आंबेडकरांनी केले मोठे वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss