spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ! ९ जणांचा अपघातात मृत्यू

पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो ही गाडी आणि एसटीमध्ये अपघात झाला.

पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. टेम्पो प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो ही गाडी आणि एसटीमध्ये अपघात झाला. आयशर टेम्पो हा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना मॅक्झिमो प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला जाऊन धडकला आणि त्यामुळे मॅक्झिमो गाडी समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली.

या अपघातात मृतांचा एकदा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मृतांमध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका लहान बाळाचा देखील समावेश आहे. जखमी झालेल्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोधलं मीडियाच्या एक्सवर पोस्ट शेअर करत अपघातातील मृतांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, असे मुख्यमंत्री पुणे पोलिस अधीक्षक यांना सांगितले आहे.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss