spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील भोर मधील धबधब्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू

सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणावर धबधबा आणि ट्रेकिंगसाठी जातात. पण पर्यटनासाठी जाताना आवशक ती काळजी घेतली पाहिजे.

सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे तरुणाई मोठ्या प्रमाणावर धबधबा आणि ट्रेकिंगसाठी जातात. पण पर्यटनासाठी जाताना आवशक ती काळजी घेतली पाहिजे. पुण्याच्या आजूबाजूला अनेक पर्यटन स्थळ आहेत. पण धबधब्यातील पाण्याचा अंदाज न घेता अनेक जण पोहण्यासाठी जातात. त्यामुळे काही वेळा पाण्यात बुडण्याची भीती असते. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनके घटना पुण्यात घडल्या आहेत.

पुण्यात (Pune) मागील काही दिवसांपासून अनेक धोकादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना भोर तालुक्यात घडली आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चार मित्र सहलीसाठी गेले होते. यावेळी त्यातील दोघांना पोहण्याचा मोह आवरला नाही म्हणून ते पाण्यात उतरले. त्यातील ऐकाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला. या घटनेमुळे काहीवेळ सगळ्यांचा गोंधळ उडाला होता. आदित्य अशोक केदारे (24, रा.हांडेवाडी, सासानेनगर, हडपसर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण हडपसर मध्ये राहणारा आहे. चार मित्र भोर मध्ये सहलीसाठी गेले होते. शनिवारी सुट्टी असल्यामुळे दोन मुली आणि मुलं सहलीसाठी गेले होते. त्यानंतर ते भाटघर धरणाच्या बॅक वॉटर पाहण्यासाठी गेले. तिकडे गेल्यानंतर हा सर्व प्रकार घडला. या घटनेची सर्व माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यांनंतर भोईराज जलआपत्ती पथकाला बोलवण्यात आले.

काहीदिवसांपूर्वी पुण्यातील एका बापलेकीचा भाटघर घरणात बुडून मृत्यू झाला होता. ऐश्वर्या धर्माधिकारी (वय १३), शिरीष धर्माधिकारी (वय ४५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीची नाव आहेत . तर शिरीष धर्माधिकारी या व्यक्तीचा शोध सुरु आहे. हे बाप लेक पुण्यात राहणारे रहिवाशी आहेत. सलग लागलेल्या सुट्यांमध्ये फलक आणि धर्माधिकारी कुटुंब भोर तालुक्यातील जयतपाड गावातील मुंगळे रिसॉर्ट या ठिकाणी गेले आहे. त्यावेळी ते सीमा फार्म हाऊच्या मागे असणाऱ्या भाटघर धरणाचे बॅक वॉटर पाहण्यासाठी गेले. त्यावेळी शिरीष धर्माधिकारी हे पूल पाहण्यासाठी गेले. त्यांनतर त्यानी त्याच्या मुलीला बोलवून घेतले. शिरीष धर्माधिकारी आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या हे भाटघर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. आणि खोल पाण्यात पोहत असताना ते दोघंही बुडाले.

Latest Posts

Don't Miss