spot_img
spot_img

Latest Posts

येरवडा कारागृहात आरोपीने केली आत्महत्या

अहमदनगर जिह्ल्यातील कोपर्डीमध्ये (Kopardi Rape Case) १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या केली होती.

अहमदनगर जिह्ल्यातील कोपर्डीमध्ये (Kopardi Rape Case) १३ जुलै २०१६ रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या केली होती. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. या हत्या प्रकरणात पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक केली होती. २०१७ नोव्हेंबरमध्ये या तिन्ही आरोपीना दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. पण या विरोधात खंडपीठाने कोणतीही सुनावणी अद्याप केली नाही. आज पहाटेच्या सुमारास पुण्यातील येरवडा कारागृहात आत्महत्या करून घेत आरोपी पप्पूने जीवन संपवलं आहे. आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आरोपी जितेंद्र शिंदे याने स्वत:च्या कपड्यानी फास लावून घेतल्याची घटना घडली आहे.या घटनेची माहिती मिळतच पोलिसांनी आरोपीचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. या आरोपीने का आत्महत्या केली याचे कारण अजून स्पष्ट झाले नाही आहे.

कोपडी हत्या प्रकरणातील जितेंद्र शिंदे येरवडा कारागृहात होता. कारागृहातील सुरक्षा खोली नंबर १ मधील १४ नंबरच्या खोलीत पप्पूने टॉवेल फाडून एका कापडी पट्टीच्या साहाय्याने खोलीच्या दरवाजावरील पट्टीला बांधून सकाळी सहा वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. हा सर्व प्रकार कारागृहातील कर्मचारी निलेश कांबळे यांच्या लक्षात आली. त्यानंतर लगेच त्यांनी बाकीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बोलवून घेतलं आणि पप्पूला खाली उतरवलं. परंतु त्याच्या जीव तेव्हाच गेला होता. आरोपी पप्पूच्या आत्महत्याच कारण अजूनही समजले नाही आहे. कारागृहात पप्पूवर मानसिक आजारावरील औषधउपचार सुरु होते.

कोपडीमध्ये १५ वर्षीय लहान मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिची हत्या केली होती. या हत्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. त्यानंतर सकल मराठा समाजाने राज्यभरात शांततापूर्ण मोर्चे काढले.या घटनेचा निषेद करण्यासाठी अनेक संघटना देखील एकत्र आल्या होत्या.त्यानंतर गावालगतच्याच वस्त्यांवर राहणारे जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे, संतोष गोरख भवाळ आणि नितीन गोपीचंद भैलुमे या तिघाना अटक करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात येणार होती.

Latest Posts

Don't Miss