Wednesday, April 24, 2024

Latest Posts

नागपूर पाठोपाठ पुण्यातील वाघेश्वर मंदिरात देखील तोकड्या कपड्यांना बंदी

नागपुरातील (Nagpur) चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तर त्यापाठोपाठ आता पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिरात देखील कपड्यांवर बंदी ही घालण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंदिरावरून अनेक वाद हे होते आहेत. मंदिरात तोकडे कपडे घालावे कि नाही यावरून हा वाद सध्या सुरु आहे. नुकतंच काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या (Tuljapur) तुळजाभवानी मंदिरातील ड्रेसकोडच्या (Dress Code) फलकावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र मंदिर महासंघाने एक मोठी घोषणा केली आहे. नागपुरातील (Nagpur) चार मंदिरांमध्ये वस्त्र संहिता म्हणजेच ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. तर त्यापाठोपाठ आता पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिरात देखील कपड्यांवर बंदी ही घालण्यात आली आहे.

पुणे शहराच्या उपनगरातील वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जर तुम्हाला दर्शनासाठी जायचं असेल तर तुम्हाला आता काही नियम हे पाळावे लागणार आहेत. पुण्यातील वाघेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी भाविकांसी ही तुफान गर्दी असते. तसेच शॉर्ट कपडे परिधान करून दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या ही हळू हळू वाढत आहे. यामुळे पावित्र्य भंग पावत आहे. अन्य भविकांचीही तशी ट्रस्टकडे तक्रार आहे. मंदिराचे पावित्र्य राखले जावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच या मंदिरात जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. तर महिलांप्रमाणे पुरुषांना देखील हे नियम लागू होणार आहेत. तर या निर्णयाचे स्वागत वाघोलीतील नागरिकांनी आणि भाविकांनी केले.

मंदिराच्या परिसरात महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट घालून मंदिरात प्रवेश करता येणार नाही. फक्त महिलांना नाही तर पुरूषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही. ड्रेसकोडबाबत मंदिराने कडक नियम घालून दिले आहेत. केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठी विविध नियम लागू करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss