सध्या सर्व काही ऑनलाइन (Online) झाले आहे. यामुळे एका मोबाईल ॲपमधून अनेक गोष्टी साध्य होतात. त्याचा फायदा सायबर गुन्हेगार (Cyber criminals) घेत आहेत. देशभरात सायबर फसवणूक करण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पुणे (Pune) शहरात अनेक उच्च शिक्षित लोकांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. ऑनलाईन फसवण्यासाठी सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवत असतात. यामुळेच मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.
पुणे शहरात सायबर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणे १६ टक्क्यांनी वाढले आहे. २०२३ च्या आठच महिन्यात सायबर गुन्हेगारीच्या २२ हजार ६७१ तक्रारी मिळाल्या आहेत. २०२२ मधील संपूर्ण वर्षात सायबर गुन्हेगारीच्या १९ हजार ५०० तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामुळे सायबर क्राईम किंवा पोलीस विभागांकडून जनजागृती करुन सर्वसामान्य नागरिक फसवले जात असल्याचे स्पष्ट होत आहे. फसवणूक झालेल्यामध्ये उच्च शिक्षित लोकांचाही समावेश आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन फ्रॉड, ओटीपी घेऊन फसवणूक, एटीएम कार्डद्वारे फसवणूक, ऑनालाईन व्यवसायचे लालच देऊन फसवणूक, मल्टी लेव्हल मार्केटींग, सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, हॉकींग करुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहे. २०२१ मध्ये १९ हजार, २०२२ मध्ये १९ हजार ५०० तर २०२३ च्या आठ महिन्यांत २२ हजार ६७१ सायबर गुन्हे दाखल झाले आहे.
सायबर गुन्हेगारी वाढल्याबद्दल बोलताना सायबर तज्ज्ञ संदीप गादिया यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार फक्त ऑनलाईन पद्धतीनेच फसवणूक करत नाही तर विविध योजनांमधूनही फसवणूक करतात. लोकही अशा योजनांच्या आहारी जातात. तसेच पैसे ट्रॅन्सफर करताना सायबर तज्ज्ञ किंवा पोलिसांचा सल्ला घेत नाही. यामुळे सायबर गुन्हेगार त्यांना सहज फसवतात. सायबर तज्ज्ञ गौरव जाचक म्हणतात, पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांपेक्षा फसवणूक झालेले प्रकार जास्त आहेत. अनेक जणांची फसवणूक ५,००० ते ८,००० दरम्यान झालेली आहे. ही लोक सायबर क्राईम विभागाकडे तक्रार देत नाही. ही रक्कमही लाखोंचा घरात आहे.
हे ही वाचा:
हिटमॅनने केला वनडेत दहा हजारांचा पल्ला क्रॉस…
कोपर रेल्वेस्थानकावरील नवीन तिकीट घर अजूनही बंदच…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.