Saturday, April 20, 2024

Latest Posts

राज्याच्या राजकारणात नव्या पक्षाची एन्ट्री, संभाजी राजे म्हणाले…

कधीकाळी भाजपसोबत असणारे संभाजी राजे यांनी याबाबत ची घोषणा केलीये आहे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून संभाजी राजे यांनी २०२४ ची निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

सध्या राज्यात आघाडी आणि युतीचे राजकारण चालू असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेना ठाकरे गट आहे. तर ठाकरे गटाने देखील संभाजी ब्रिगेडशी युती करत त्यांनाही राज्याच्या राजकारणात उतरवले आहे. तर दुसरीकडे बघितले तर भाजप अन् शिवसेना युती आहे. तर आता या सर्व राजकीय पक्षांना सामोरे जाण्यासाठी आता आणखी एका नवीन पक्षाची राज्याच्या राजकारणात एन्ट्री होत आहे. एका मोठ्या नेत्याने म्हणजेच कधीकाळी भाजपसोबत असणारे संभाजी राजे यांनी याबाबत ची घोषणा केलीये आहे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून संभाजी राजे यांनी २०२४ ची निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

आज पुण्यात संभाजी राजे यांच्या उपस्थितीत स्वराज्य भवनाचा लोकार्पण सोहळा पार पाडला. त्यानंतर संभाजी राजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलत असताना संभाजी राजे यांनी २०२४ ची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. स्वराज्य संघटना कुठल्याही परिस्थितीत २०२४ ला निवडणूक लढवणार आहे. तयारीला लागा, आपण निवडणुका लढवू, अशी घोषणा संभाजी राजे यांनी केली. संघटनेचा अजेंडा पुढचं नियोजन अणि ध्येय हे सगळ अधिवेशनात बोलणार असल्याचे संभाजी राजे यांनी सांगितले. स्वराज्य संघटना भक्कम होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

तसेच पुढे संभाजी राजे म्हणाले आहेत की, सर्व जण अडचणी घेऊन येतील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वराज्य भवन उभारले आहे. या ठिकाणी सगळ्याचा अडचणी समजून घेतल्या जातील. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी हे कार्यालय असणार आहे. स्वराज्य सामान्य लोकांचं आहे म्हणून उद्घाटन त्यांच्या हस्ते केले. यावेळी उदयन राजे यांच्या प्रश्नावर बोलणं संभाजी राजे यांनी टाळलं.

हे ही वाचा:

Gadar Trailer, २२ वर्षांनंतरही ‘गदर’चा उत्साह कमी झाला नाही, ठरलेल्या तारखेच्या आधीच रिलीज होणार ‘गदर’

Gujrat Titans ची यंदाची कामगिरी, IPL 2023 चा प्रवास

मलेशिया सुपर ५०० बॅटमिंटन स्पर्धेत P.V sindhu आणि Prannoy यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss