विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला आणि त्यानंतर आता महायुतीचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महायुतीला बहुमत मिळालं आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यानंतर विरोधक आक्रमक झाले आणि ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप करत आंदोलन सुरु केले. आजचा दिवस लक्षात राहणारा आहे. बाबा आढाव प्रेरणा देणारे आणि प्रेरणा कधी म्हातारी होऊ शकत नाही. हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही. वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातुन सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला. या घोळात एक मोठा विषय इव्हीएमचा आहे. माझे मत कोठे जाते हे समजायला हवे. शेवटच्या एका तासात ७६ लाख मते का वाढली. एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला.
बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पुजा-अर्चा करण्यासाठी का जातायत? अमावस्येला पुजा अर्चा करण्यासाठी गेलेत यावरुन यांची मानसिकता दिसुन येते. महाराष्ट्र लेचा पेचा नाही. महाराष्ट्र देशाला दिशा देईल. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील. बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घ्यावे. हेच जर आमच्याबाबतीत असंत तर राष्ट्रपती राजवट लागली असती, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
डॉ. बाबा आढाव हे ९४ वर्षाचे आहे. त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलं केलं. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याने महायुतीचा विजय झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. ३ दिवसांपासून ते उपोषणावर बसले होते. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं आहे. अजित पवार यांनी देखील त्यांची आज भेट घेतली. शरद पवार यांनी देखील बाबा आढाव यांच्याशी भेटून संवाद साधला. मात्र त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या हस्ते आपलं उपोषण सोडलं.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंची चुप्पी अन् भाजपला ताप ! शिंदेंच्या मनात नेमकं दडलंय तरी काय ?
शिंदे गटातील ‘या’ ४ नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा विरोध, Eknath Shinde काय भूमिका घेणार?