सध्या गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराने डोके वर काढले आहे. पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम या रुग्णांची संख्या शंभराच्या पार गेली आहे. एका आठवड्यातच पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या १०१ वर पोहचली आहे. यामधील काही रुग्णांची संख्या ही चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत.
पुण्यामध्ये एकाच दिवसात २८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून २५ हजार ५७८ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी ६८ पुरुष आणि ३३ महिला आहेत.
पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोममुळे ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गुलेन बॅरी सिंड्रोममुळे झालेला हा राज्यातला पहिला मृत्यू आहे. पुण्यातील धायरी परिसरात वास्तव्याला असणाऱ्या ४०वर्षीय व्यक्तीला गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली होती. त्यानंतर तो उपचारासाठी सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आले आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम संसर्ग होण्याची कारणे-
- दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जीबीएसचा संसर्ग होऊ शकतो.
- संसर्गामुळे अतिसार आणि पोटात वेदना होऊ शकतात.
- काही लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते.
- सहसा व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर मज्जातंतूविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती हल्ला करते.
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाल्यास कोणती काळजी घ्यावी-
- पाणी उकळून व गाळून प्यावे.
- उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
- अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
हे ही वाचा :
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .