spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील ‘वृक्षगजानन’ मूर्तीला मोठी मागणी

गणपती (Ganeshotsav 2023) बाप्पाच्या आगमनासाठी आता सगळीकडे जोरदार तयारी चालू झाली आहे. अवघ्या काही दिवसातच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे.

गणपती (Ganeshotsav 2023) बाप्पाच्या आगमनासाठी आता सगळीकडे जोरदार तयारी चालू झाली आहे. अवघ्या काही दिवसातच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. पुण्यातील (Pune) मानाचे पाच गणपती पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. लालबागचा राजा, दगडूशेठ, शारदा गणेश या मुर्त्यांसोबतच आता पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची मागणी देखील वाढली आहे. यावर्षी पुण्यातील शाडूच्या मूर्तीसोबतच ‘वृक्षगजानन’ मुर्त्यांची क्रेझ वाढली आहे. विशेष म्हणजे या मुर्त्या पर्यावरणपूरक शेतमातीपासून बनवल्या आहेत. विसर्जनावेळी या मूर्ती सोबत दिलेल्या कुंडीत विसर्जित केल्यांनतर त्यात झाड लावता येत. या मूर्तीची संकल्पना डॉ. अक्षय कवठाळे यांची आहे.

पुण्यातील डॉ. अक्षय विठ्ठल कवठाळे यांनी त्याचें वडिल “कृषीशास्त्रज्ञ विठ्ठल केशव कवठाळे” यांची मदत घेऊन ही ‘वृक्षगजानन’ मूर्ती साकारली आहे. २०१३ मध्ये ही संकल्पना सुरु केली होती. त्यानंतर २०१५ मध्ये गणेशमूर्तींचा आकार, त्यांचा टिकाऊपणा, सप्लाय चेन मेंटेन याचे अनुभव घेऊन बदल करण्यात आले. २०१७ मध्ये व्यवसायातील डिस्ट्रीब्युशन चेन तयार करण्यात आली. वृक्षगजानन या मुर्त्या महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, मध्यप्रदेश, आंधरप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये पाठवल्या जातात. त्याचबरोबर दुबई, यूके, यूएस, जर्मनी, जपान या देशांमध्येसुद्धा पोहचत आहेत. महाराष्ट्रमध्ये या मूर्तीचे आउटलेट्स लागतात. या मुर्त्या होलसेल आणि रिटेल भावात उपलब्ध आहेत.

वृक्षगजानन ही मूर्ती ऑर्डर केल्यानंतर दोन बॉक्स येतात. एका बॉक्समध्ये एक गणपतीची मूर्ती येते आणि सोबत सिल्वर कोटेड पाट येतो. तर दुसऱ्या बॉक्समध्ये कुंडी आणि कृष्णतुळशीचे ऑथेंटिक ब्रीड (Authentic Breed) असलेल्या बियांचे पाकीट दिले जाते. बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर मूर्तीच्या मातीमध्ये तुळशीच्या बिया टाकल्या जातात. तुळशीच्या रूपाने पूजा होते आणि गणपतीचे पावित्र्य राखले जाते. ही मूर्ती निसर्गपूरक रंगाने रंगली जाते.

Latest Posts

Don't Miss