spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात बेकायदा पिस्तूलचा नाद पडला महागात…

पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुन्हेगारीच्या आरोपाखाली अनेक तरुणांना अटक देखील करण्यात आली आहे.

पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गुन्हेगारीच्या आरोपाखाली अनेक तरुणांना अटक देखील करण्यात आली आहे. तरूणांकडून अरेरावी, गोळीबार याचे प्रमाण वाढले आहे. यातच आता बेकायदेशीर बंदूक हाताळताना चुकून गोळ्या लागून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. हा सर्व प्रकार हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडला आहे. अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमी झालेल्या तरुणावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी आरोपी अभय छबन वाईकर (वय २२), अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभय छबन वाईकर आणि अविष्कार तुकाराम धनवडे हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. हे दोघंही मित्र एकाच गावात राहतात . वाईकर यांनी गावात दहशत माजवण्यासाठी एक बेकादेशीररित्या बंदूक घेतली. हि बंदूक त्याने अविष्कार यास हाताळण्यासाठी दिले. यावेळी बंदूक हाताळत असताना त्याच्या हातून गोळी झाडली गेली. ही बंदुकीची गोळी अभयच्या मानेला लागली आणि तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर त्याला पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुण्यातील सांगरून गावात ही घटना घडली आहे.

काही महिन्यांपूर्वी अशीच एक घटना पुण्यात घडली होती. मित्रावर इम्प्रेशन पाडण्यासाठी बेकायदेशीररित्या घेतलेल्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला होता. ही घटना पुण्यातील खडकवासला धरणाच्या परिसरात घडली होती. या गोळीबारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारांनी तिघांनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस प्रकाश गोंधळे, अजिंक्य भानुदास मोडक आणि चेतन मच्छिंद्र मोरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तेजस प्रकाश गोंधळे, अजिंक्य भानुदास मोडक आणि चेतन मच्छिंद्र मोरे हे तिघे फिरण्यासाठी खडकवासला धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मित्रावर इम्प्रेशन पाडण्यासाठी तेजसने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीने गोळीबार केला. ही घटना वेटरच्या लक्षात आल्यानंतर त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली . त्यानंतर तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मित्रावर इम्प्रेशन पाडण्याच्या नादात तेजसने त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून गोळीबार केल्याचं समोर आलं होतं.

Latest Posts

Don't Miss