spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद…

०१ सप्टेंबर म्हणजेच येत्या गुरुवारी (thursday) पुण्यात (Pune) पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे.

०१ सप्टेंबर म्हणजेच येत्या गुरुवारी (thursday) पुण्यात (Pune) पाणीपुरवठा (Water supply) बंद राहणार आहे. पुण्यातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:शृंगी, वडगांव जलकेंद्र, कोंढवे-धावडे जलकेंद्र आणि भामा आसखेड जलकेंद्रात देखभाल दुरुस्तीची कामे (Repair works) करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट परिसर, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, खराडी, वडगांवशेरी, ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, मालधक्का, येरवडा, रेसकोर्स, मुळा रस्ता, खडकी, हरीगंगा सोसायटी, लोहगांव, विमाननगर, वडगांवशेरी, कल्याणीनगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा, कळस, धानोरी, पाषाण, भूगाव रस्ता, बावधन, उजवी आणि डावी भुसारी कॉलनी, गुरुगणेशनगर, चिंतामणी सोसायटी, पूजा पार्क, सारथी शिल्प सोसायटी, डुक्कर खिंड परिसर, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमंहसनगर, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, सूस रस्ता, रेणूकानगर, पॉप्युलर नगर या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मध्यवर्ती भागातील सर्व पेठा, क्वॉर्टरगेट परिसर, गंजपेठ, गुरुवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर, स्वारगेट, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर १ आणि २, लेक टाऊन परिसर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी गावठाण, डायस प्लॉट, ढोले मळा परिसर, सॅलेसबरी पार्क, गिरीधर भवन चौक परिसर, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज, धनकवडी परिसर, हडपसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, काळे पडळ, बीटी कवडे रस्ता, भीमनगर, रामटेकडी, औद्योगिक परिसर, वानवडी याही परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वारजे माळवाडी, गोकुळनगर, अतुलनगर, महात्मा सोसायटी, एकलव्य महाविद्यालय परिसर, धनंजय सोसायटी, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसर, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसर, हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर, कर्वेनगर गावठाण, तपोधान परिसर, रामनगर, कालवा रस्ता, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड क्लब रस्ता, विजनगर, दत्तनगर, कर्वेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर गल्ली क्रमांक एक ते दहा, गोखलेनगर, औंध, बोपोडी, विद्यापीठ परिसर, विधी महाविद्यालय रस्ता, बीएमसीसी, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, दशभूजा गणपती परिसर, नळस्टॉप, वकीलनगर, करिष्मा सोसायटी, शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी परिसर, रेव्हेन्हू कॉलनी, वडारवाडी, श्रमिक वसाहत, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जयभवानीनगर, केळेवाडी, आयडीयल कॉलनी, जनवाडी, वैदूवाडी, संगमवाडी, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव, येवलेवाडी या भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे.

हे ही वाचा: 

भिवंडीतील धक्कादायक घटना आली समोर, ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि बेदम…

माझा आता पर्यंतचा प्रवास कष्टसाध्य होता पण… Shreya Ghoshal

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss