मागील काही महिन्यांपासून पुण्यात (Pune) गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. पुण्यात बांगलादेशी (Bangladesh) नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरातील काही भागांमध्ये हे नागरिक राहत आहेत. आता पुणे पोलिसांनी या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. चुकीच्या पद्धतीने हे नागरिक पुण्यामध्ये वास्तव करत आहेत. यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ३१ ऑगस्ट गुरुवारी रात्री पोलिसांनी १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. यामध्ये १० महिला आणि ९ पुरुष यांचा समावेश आहे.
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात हे बांगलादेशी नागरिक राहत आहेत. यातील महिला या वेश व्यवसाय करतात तर पुरुष हे वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहेत. ही कारवाई पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेतील पोलिसांनी केली आहे. हे सर्व नागरिकानी बांगलादेशच्या सेमीवरून चुकीच्या पद्धतीने भारतात प्रवेश केला आहे. बुधवार पेठेतील सागर नावाच्या इमारतीमध्ये हे १९ जण राहत होते. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कायदेशीर कागदपत्र नसल्याचे पोलीस तपासातून समजले आहे. १ ऑगस्ट रोजी पुणे सामाजिक विभागाला बुधवार पेठेत बांगलादेशी नागरिक राहतात याची माहिती मिळाली. त्यानंतर ३१ दिवसांनी पुणे पोलिसांनी छापा टाकून या सर्व १९ जणांना अटक केली आहे.हे सर्व नागरिक मागील तीन महिन्यांपासून पुण्यातील बुधवार पेठेत राहत होते. १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. मागील काही वर्षांपासून पुण्यात ५००० हजार पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक वाढले आहेत. हे नागरिक राज्यातील वेगवेगळ्या जिह्ल्यामध्ये राहत आहेत. पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे बांगलादेशी नागरिक सगळीकडे फिरत आहेत. त्यामुळे बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा विषय चर्चेत आला आहे. या सगळ्यावर पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. बांगलादेशी घुसखोरी शोधणे, कागदपत्र चेक करणे अशा मोहीम राबवल्या पाहिजेत.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेनी दिले ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ला समर्थन
१ सप्टेंबर पासून मुंबईमध्ये दुधाच्या दरात होणार एवढ्या रुपयांनी वाढ
भारतातील प्रत्येकाचा हिंदू संस्कृतीशी संबंध, मोहन भागवत