सोशल मीडियावर स्वारगेट एसटी डेपोमधील प्रकार हा सहमतीने झाला असल्याच म्हंटल जात होतं. या प्रकरणातील पीडित तरुणीने आरोपीकडून पैसे घेतले होते असे आरोप सुद्धा तिच्यावर करण्यात आला होता. तसेच दोघांची या आधीच ओळख होती असे देखील सांगण्यात आले होते. मात्र सोशल मीडियावर बोल गेलेले या सर्व गोष्टी पसरत असलेले नरेटीव्ह दत्ता गाडेच्या वकिलाने खोडून काढले आहे. आरोपी आणि पीडित तरुणी मध्ये व्यवहार झाल्याचे आम्ही बोललो नसल्याची कबुली आरोपीचे वकील वाजीद खान यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिली.
आरोपी दत्ता गाडे याचे एक वकील वाजीद खान यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये ते बोलत होते पीडित तरुणी आणि आरोपी यांचे लोकेशन, आर्थिक व्यवहार आणि एकमेकांच्या ओळखीबद्दल केलेल्या दाव्यावर वकिलांचे कुठले ही स्पष्टीकरण आजच्या पत्रकार परिषदेत देण्यात आले नाही. पीडित तरुणी आणि आरोपी यांच्या ओळखीबद्दल अधिकृत वकिलांकडून कुठली ही बाजू मांडण्यात आलेली नसल्याची माहिती आज वकिलांनी दिली. “त्या दोघांच्यामध्ये अर्थी व्यवहार झाला असे आम्ही बोललोच नाही” असा दावा सुद्धा यावेळी वाजीद खान यांनी केला आहे.
दरम्यान, आरोपी दत्ता गाडे याचे वकील वाजीद खान यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली. या संबंधी खान यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना संरक्षणाच्या मागणीचे पत्र सुद्धा लिहिले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना सोशल मिडियावर निगेटिव्ह कमेंट येत आहेत. प्रकरण लढण्यासाठी प्रकरणाच्या वेळीस आम्हाला पोलिस संरक्षण देण्यात यावे असे अर्जात म्हटले आहे.
आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत आरोपीच्या वकिलांसोबत दत्ता गाडे याचा भाऊ सुद्धा उपस्थितीत होता. जे काय प्रकरण झालं त्याची अंतिम चौकशी व्हायला पाहिजे होती. ज्या महिलेसोबत ही घटना घडली तिला सुद्धा न्याय मिळाला हवा. आरोपीला फाशी दिली तरी चालेल पण घटना सत्य आहे का नाही हे तपासायला पाहिजे असे मत दत्ता गाडे याच्या भावाने व्यक्त केले.
हे ही वाचा:
Oscar 2025 : ‘या’ चित्रपटांना मिळणार सर्वोत्कृष्ट पुरस्कार; वाचा सविस्तर बातमी
BMC चा पेपर फुटला? पेपरफुटी घोटाळा Raj Thackeray यांच्या कोर्टात जाणार