पुणे (Pune) जिल्ह्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना (Malegaon Cooperative Sugar Factory) हा राज्यात ऊसाला सर्वाधिक दर (sugarcane Price) देणारा कारखाना ठरला आहे. या कारखान्याने २०२२-२३ मध्ये गाळप झालेल्या ऊसाला ३ हजार ४११ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे (Balasaheb Taware) यांनी दिली. माळेगाव कारखाना गतवर्षी गाळप केलेल्या ऊसाला किती दर देणार याकडं शेतकऱ्यांचं (Farmers) लक्ष लागलं होतं. अखेर कारखान्यानं ऊसाला सर्वोच्च दर जाहीर केलाय. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा (Ajit Pawar) शब्द खरा ठरला आहे. सोमेश्वर कारखान्यापेक्षा (Someshwar Factory) माळेगावचा कारखाना अधिक दर देईल असे अजित पवार बारामतीच्या (Baramati) सभेत म्हणाले होते.
दरम्यान, मागील काही दिवसापूर्वीच पुणे जिल्ह्यातील बारामती (Baramati) तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊसाला सर्वाधिक दर देण्याचा निर्णय घेतला होता. सोमेश्वर कारखान्याने कारखान्याने २०२२-२३ सालात गाळप झालेल्या ऊसाला ३ हजार ३५० रुपयांचा दर जाहीर केला होता. गेल्या वर्षीच्या ऊस दराची कोंडी फोडत राज्यात सर्वोच्च दर देणारा सोमेश्वर कारखाना हा राज्यातील पहिला कारखाना ठरला होता. मात्र, त्यानंतर माळेगाव कारखान्यानं सोमेश्वर साखर कारखान्यापेक्षा ऊसाला अधिक दर देण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळं माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राज्यात ऊसाला सर्वोच्च दर देणारा कारखाना ठरला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा साखर कारखाना आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीपेक्षा (FRP) ५६१ रुपये अधिकचा दर देणार आहे. तर गेटकेनधारक शेतकऱ्यांना ३ हजार १०० रुपये प्रमाणे अंतिम ऊसाचे बिल आदा केलं जाणार आहे. सध्याला एफआरपीपेक्षा जादा रक्कम देण्यात माळेगाव साखर कारखाना राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव (Sagar Jadhav) यांनी दिली. माळेगाव कारखान्यानं गतवर्षीच्या हंगामात १२ लाख ५७ हजार ४६५ मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये सभासदांचा ७ लाख २६ हजार, तर गेटकेनधारकांचा 5 लाख 33 हजार मेट्रीक टन ऊस गाळप केला होता. तसेच ११.८१ टक्के रिकव्हरीनुसार १३ लाख २८ हजार ९०० क्विंटल साखर निर्मिती केली होती. त्याचबरोबर सहविजनिर्मितीतून देखील कारखान्याला चांगला फायदा झाला होता. दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्यांची जाहीर सभा झाली होती. या सभेत बोलताना अजित पवारांनी माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखान्यापेक्षा निश्चितपणे अधिकचा दर देईल, असे सांगितले होते. त्यामुळं माळेगावचा कारखाना नेमका किती दर देणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. अखेर अजित पवार यांचा शब्द खरा ठरला आहे. माळेगाव कारखान्यानं ३ हजार ४११ रुपयांचा दर दिला आहे.
हे ही वाचा:
शाहरुख खानच्या बहुप्रतीक्षित ‘Jawan’ चित्रपटाचा चा ट्रेलर आऊट, किंग खानचे वेगवेगळे लूक्स आले समोर
जिथे ‘इंडिया’ युतीची बैठक होणार तिथे उद्धव ठाकरे गटाने लावले भगवे झेंडे, म्हणाले…
Follow Us